Farmer Incentive Scheme : ‘प्रोत्साहन’पासून ५५ हजार शेतकरी वंचित

Farmer Scheme : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये देण्याचे जाहीर करण्यात आले होते.
Farmer
FarmerAgrowon

Yavatmal News : महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्‍ती योजनेचा लाभ अनेकांना मिळाला. मात्र कर्जाचा नियमित भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना उपेक्षितच राहावे लागले असून, तब्बल ५५ हजार शेतकरी ५० हजार रुपयांच्या अनुदानापासून वंचित असल्याचे धक्‍कादायक वास्तव समोर आले आहे.

Farmer
Maharashtra Karjmukti Yojana : प्रोत्साहन अनुदानाची शेतकऱ्यांना प्रतीक्षाच

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये देण्याचे जाहीर करण्यात आले होते. सुरुवातीला काही शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्‍कम वळती करण्यात आली होती.

कधी सर्व्हर डाउन, तर कधी पात्र लाभार्थ्यांच्या नावातील चुका या कारणाआड आजपर्यंत शेतकऱ्यांना लाभापासून झुलवत ठेवण्यात आले. वरील योजनेअंतर्गत एकट्या महागाव तालुक्‍यात किमान पाच हजार शेतकरी योजनेपासून वंचित आहेत.

यवतमाळ जिल्ह्याच्या सर्व तालुक्‍यांतील वंचित शेतकऱ्यांची संख्या ५५ हजार ३३७ इतकी आहे. शेतकरी दररोज आपले बॅंक खाते तपासतात, मात्र अनुदानाची रक्‍कम त्यांच्या खात्यात जमा होत नसल्याने त्यांच्यामध्ये अस्वस्थता आहे.

आर्णी ४२८९, बाभूळगाव १८६४, दारव्हा ३३६६, दिग्रस ३३५०, घाटंजी ५४०९, कळंब १९१०, केळापूर २४३३, महागाव ५९४९, मारेगाव २६०८, नेर २५३१, पुसद ४६७८, राळेगाव ३१८४, उमरखेड ४१९३, वणी ४६८०, यवतमाळ २५०८, झरी २४६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com