Water Supply By Tanker Agrowon
ॲग्रो विशेष

Water Storage in Dams in Nashik Division : नाशिक विभागातील सर्व धरणातील पाणीसाठा ६६.६६ टक्क्यांवर; मात्र ६६ गावांसह ३०२ वाड्यांचा घसा कोरडाच

Water Supply By Tanker : राज्यात विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाने सुरूवात केली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये दमदार पाऊस होत असून नाशिक जिल्ह्यास देखील पावसाने झोडपले आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्यातील विविध जिल्ह्यात विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाची संततधार सुरू झाली असून नाशिक जिल्ह्यात देखील पावसाचा जोर वाढला आहे. एकीकडे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात गेल्या दोन-चार दिवसापासून होणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यातील ६६ गावांसह ३०२ वाड्यांचा घसा कोरडाच असून यांना पावसाळ्याच्या मध्यातही ९१ टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. यामुळे या गावांसह वाड्यावस्त्यांतील नागरीकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

नाशिकच्या धरण क्षेत्रात पाऊस

नाशिक जिल्ह्यातील धरण क्षेत्रात गेल्या काही दिवसांत पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. येथील दारणा धरणासह गंगापूर धरणाच्या धरण क्षेत्रात गेल्या दोन तीन दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे धरणाती पाणी पातळीत वाढ झाली आहे. दारणा धरणासह गंगापूर धरणातून अनुक्रमे २ हजार क्यूसेस आणि ५०० क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. दरम्यान नांदूर मधमेश्वर धरणातून देखील गोदावरी नदी पात्रात ६ हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग केला जात आहे. सध्या हवामान विभागाने नाशिक जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला असल्याने गंगापूर आणि दारणा धरणात पाणी वाढण्याची शक्यता विसर्ग वाढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गवांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

नाशिक विभागातील पाणीसाठा

महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या शनिवार (ता.२४) च्या आकडेवारीनुसार नाशिक विभागातील सर्व ५३७ धरणातील पाणीसाठा ६६.६६ टक्क्यांवर पोहचला आहे. जो गेल्या वर्षी याच दिवशी ५६.२२ टक्के होता. सर्व मोठ्या २२ धरणांचा पाणीसाठा ७८.१९ टक्के झाला असून तो मागील वर्षांपेक्षा ८.८ टक्कांनी अधिक आहे. तर मध्यम आणि लघू प्रकल्पातील पाणीसाठी हा क्रमश: ५५.६१ आणि ३७.१५ टक्क्यांवर आला आहे.

९१ टँकरच्या मदतीने पिण्याचे पाणी

एकीकडे राज्याप्रमाणेच जिल्ह्यात देखील चांगल्या पावसाची नोंद होत आहे. जिल्ह्यातील सर्व धरणातील पाणीसाठा ६६.६६ टक्क्यांवर गेल्याने पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न काही अंशी मार्गी लागला आहे. तर दारणा धरणासह गंगापूर धरण अनुक्रमे ९७.२० आणि ९३.०४ टक्के भरले आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मात्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या मागील आठवड्यातील (१९ तारखेच्या) टँकरच्या अहवालानुसार जिल्ह्यातील ६६ गावांसह ३०२ वाड्यांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. या गावांसह वाड्यावस्त्यांना भरपावसाळ्यात तहान भागवण्यासाठी ९१ टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे.

शेतकऱ्यांना दिलासा

गेल्या आठवड्यात पावसाने विश्रांती घेतल्याने जिल्ह्यात उकाडा वाढला होता. तसेच काहीच दिवसांपुर्वी केलेल्या भात पीकाच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता पसरली होती. मात्र आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाचे आगमन झाल्याने उकाड्यापासुन दिलासा मिळाला आहे. तर अनेक दिवसांनी जोरदार पाऊस होत असल्याने शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केलेले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: हळदीचे दर स्थिर; मोहरीचे दर टिकून, उडदाचा बाजार दबावात, गव्हाचे दर स्थिरावले, जिऱ्याचे भाव टिकून

Onion Subsidy: कांदा अनुदान योजना; सातबारावर नोंद नसलेल्या शेतकऱ्यांना २८ कोटींचे अनुदान

Banana Farming: केळी बागेचे उत्पादन वाढवण्यासाठी योग्य खत व पाणी व्यवस्थापन

Farmers Protest : ‘काळा’ पोळा करून सरकारला इशारा

Jayakwadi Dam : जायकवाडीच्या आवकेत, विसर्गात वाढ

SCROLL FOR NEXT