Rain Update  Agrowon
ॲग्रो विशेष

Heavy Rain : तलावाची पाळ फुटल्याने ३०० घरांत शिरले पाणी

Monsoon Rain Update : चिचपल्ली गावात मामा (माजी मालगुजारी) तलावाची पाळ फुटल्याने ३०० घरांत पाणी शिरले.

Team Agrowon

Nagpur News : पूर्व विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली असली तरी चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम होता. परिणामी चिचपल्ली गावात मामा (माजी मालगुजारी) तलावाची पाळ फुटल्याने ३०० घरांत पाणी शिरले. याची दखल घेत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तत्काळ उपाययोजनांचे निर्देश दिले आहेत.

पूर्व विदर्भात शनिवारी (ता. २०) पावसाने हाहाकार उडाला होता. नागपुरातील सखल भागातील वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले. भंडारा, गडचिरोली, यवतमाळ तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक मार्गावरील वाहतूक प्रभावित झाली.

रविवारी (ता.२१) पावसाचा जोर ओसरल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली असली तरी गडचिरोली जिल्ह्यात ३ ते ४ मार्गावरील वाहतूक अद्यापही बंद आहे. यवतमाळ जिल्ह्यात देखील धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे काही नदी, नाले भरल्याने रस्ते वाहतूक प्रभावित झाली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात मात्र पावसाचा जोर दुसऱ्या दिवशी देखील कायम होता. मुल तालुक्‍यात पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले. अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने धान्य व इतर साहित्याचे नुकसान झाले. तालुक्‍यातील अनेक मार्ग रविवारी देखील बंद होते. ब्रम्हपुरी तालुक्‍यातील मालडोंगरी-मेंडकी मार्गावर असलेल्या मामा तलावाची पाळ फुटली. यामुळे शेकडे एकर जमीन पाण्याखाली आली आहे. या तलावाला लागून असलेल्या धानोलीपोहा या गावातही पाणी शिरले आहे.

जामसाळ्यात पूरस्थिती

उमा नदीला पूर आल्याने सिंदेवाही तालुक्‍यातील जामसाळा या गावातही पूरस्थिती निर्माण झाली आहे. इरई धरणाचे सातही दरवाजे उघडण्यात आल्याने सखल भागात पाणी शिरू लागले आहे. शनिवारी (ता.२०) पुराच्या पाण्यात नागभीड तालुक्‍यातील विलम या गावातील प्रमोद बावणे हा मुलगा वाहून गेला होता. त्याचा मृतदेह रविवारी (ता.२१) मिळून आला. बॅंकेचे कामकाज आटोपून घराकडे जात असलेले दोन कर्मचारी पुरात वाहून गेले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT