Agriculture Irrgation Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Irrigation : कडवा कालव्याला ३०० क्युसेकने रब्बी आवर्तन

Rabi Season Irrigation : कडवा धरणातून रब्बीसाठी ३०० क्युसेक क्षमतेने आवर्तन सोडण्यात आले असून गहू, हरभरा, मका यासह फळबागांना लाभ देण्यात येणार आहे.

Team Agrowon

Nashik News : कडवा धरणातून रब्बीसाठी ३०० क्युसेक क्षमतेने आवर्तन सोडण्यात आले असून गहू, हरभरा, मका यासह फळबागांना लाभ देण्यात येणार आहे. दरम्यान कालव्याच्या ८८ किलोमीटर वरील पुतळेवाडी येथून वितरणाला सुरुवात होणार आहे.

कालव्याला सुरुवातीला २५० क्युसेक क्षमतेने पाणी सोडण्यात आले होते. ही क्षमता ३०० क्युसेकपर्यंत वाढवण्यात आली आहे. आवर्तन सुरळीत पार पाडण्यासाठी जलसंपदा विभागाने पोलिस, वीज महावितरण, महसूल विभागालाही पत्र दिले आहे. गतवर्षी १८ दिवस उलटूनही शेवटच्या टोकाला पाणी पोहोचले नव्हते. कालव्याचे गट तोडणे, डिझेल पंप टाकून पाणी चोरी करण्याचे प्रकार घडले होते.

यंदा पावसाळा चांगला झाल्याने अशी स्थिती ओढावण्याची शक्यता कमी असली तरी प्रशासनाने कर्मचाऱ्यांचे गस्ती पथक तयार केले असून पाणी चोरीवर पथकाचा वॉच असणार आहे. किमान १० ते १२ दिवसात शेटवच्या टोकाला पाणी पोहोचण्याचा अंदाज आहे.

दुसऱ्या दिवशी २५ डोंगळे उद्ध्वस्त

कडवा कालव्यातून रब्बीसाठी सोडण्यात येणाऱ्या आवर्तनासाठी जलसंपदा विभागाने कालव्यात टाकलेल्या डोंगळ्यांची शोध मोहीम हाती घेतली आहे. शुक्रवारी (ता. २४) १५ किलोमीटर अंतराची शोध मोहीम राबवण्यात आली.

त्यात ३० डोंगळे उद्ध्वस्त करण्यात आले. दुसऱ्या दिवशीही शनीवारी (ता. २५) डोंगळे शोध मोहीम राबवण्यात आली. भेंडाळे ते वडांगळी दरम्यान २५ हून अधिक डोंगळे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

India Onion Export: बांगलादेशात पाच महिन्यांनंतर भारतीय कांद्याची निर्यात

Agricultural Export: कृषी निर्यात चार लाख कोटींवर

Papaya Supply: खानदेशात पपईची आवक नीचांकी स्थितीत

Vidarbha Heavy Rain: विदर्भात पावसामुळे हाहाकार

Rabi Crops Trials: राज्यात दहा हजार हेक्टरवर पीक पद्धतीवर रब्बी प्रात्यक्षिके

SCROLL FOR NEXT