
Ahilynagar News : शासनाच्या योजनेतून सौरपंप मिळालेला असतानाही त्याचे साहित्य बसवण्यासाठी सबंधित कंपनीच्या लोकांकडून शेतकऱ्यांची आर्थिक लूट केली जात असल्याचा आरोप भारतीय जनसंसदच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी करून शेतकऱ्यांकडून घेतलेले पैसे परत करण्याची मागणीही जनसंसदने केली आहे.
भारतीय जनसंसदच्या पदाधिकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की दोन वर्षांपूर्वीच अनेक शेतकऱ्यांनी शासनाच्या जाहिरातीनुसार पी. एम. कुसुम योजनेत ऑनलाइन सौर कृषी पंपासाठी अर्ज दाखल केले होते. अर्ज दाखल करतानाही जादा पैसे घेत असल्याच्या तक्रारी झाल्या होत्या.
अर्ज मंजुरीनंतर दहा टक्के रकमाही शेतकऱ्यांनी भरल्या. आता पंप, मोटार, केबल, पाइप, सौर पॅनल आदी साहित्य आल्यावर ते शेतात बसवून व जोडणी करणे आणि पंप चालू करण्यासाठी संबंधित कंपन्यांच्या ठेकेदारांनी साध्या कामगारांना ही कामे वाटून दिली आहेत.
कंपन्यामार्फत ही कामे होत असली, तरी त्यात तांत्रिकदृष्ट्या सक्षम कोणीच नसल्याने पंप चालू न झाल्यास त्याचा त्रास शेतकऱ्यांना होत आहे. विशेष म्हणजे साहित्य उतरून घेतल्यावर वाहतूक, हमालीचे पैसे, सोलर पॅनल उभे करण्यास फाउंडेशनसाठी खड्डे खोदई, काँक्रिटमध्ये पोल उभे करण्यासाठी सिमेंट, खडी, वाळू, डबर, पाणी वाहतुकीसाठी ट्रॅक्टर हे सर्व शेतकऱ्यांनाच द्यावे लागत आहे.
साहित्य नसल्याचे पैसे मागितले जात आहेत. जोडणी करून पंप चालू होईपर्यंत सर्व कामगार त्यांचा मोबदला अगोदरच ठरवून घेतात. यात एका पंपासाठी सुमारे ५ ते ६ हजार रुपयांचा भुर्दंड शेतकऱ्यांना बसतो. हा सर्व खर्च कंपनीच्या ठेकेदाराने करावयाचा असतो.
मात्र, अनेक शेतकऱ्यांना याबाबत फारशी माहिती नसल्याने व सोलरवर पंप चालू होणार असल्याने तेही पैसे देतात. ज्यांनी पैसे देण्यास विरोध केला किंवा नकार दिला, तर त्यांचे पंप उभारणीस विलंब करून पैसे द्यायला भाग पाडले जाते. पंप जोडणीसाठी कंपन्यांकडून ठेकेदारांना पूर्ण रकमा दिल्या जातात. शेतकऱ्यांकडून त्यांनी एकही रुपयाची अपेक्षा करायला नको.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.