Nashik News: मालेगाव वांजूळपाणी संघर्ष समितीतर्फे जल-जन यात्चा रे प्रारंभ करण्यात आला. नार-पार-गिरणा नदीजोड वांजूळपाणी संघर्ष समिती, आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीतर्फे चंदनपुरी येथील श्रीक्षेत्र खंडेराव महाराज मंदिर येथे जलजागृती यात्चा रे प्रारंभ खंडेराव महाराजांची तळी भरून करण्यात आला. विश्वासराव देवरे, पुरुषोत्तम काबरा, रामदास बोरसे, कैलास पवार, शरद खैरनार यांनी श्रीफळ वाढवले.
नार-पार-गिरणा नदी जोड प्रकल्पातून ३० टीएमसी पाणी मिळावे तसेच प्रकल्पाला संपूर्ण निधी उपलब्ध करून निर्धारित कालमर्यादेत काम पूर्ण व्हावे, चणकापूर डावा कालवा जामशेत पिंपळदर भाक्षीमार्गे मोसम नदी ते कजवाडेमार्गे बोरी नदीत पाणी टाकून संपूर्ण माळमाथ्याला व धुळे जिल्ह्यात पाणी द्यावे, अप्पर पुनद धरणाची निर्मिती करण्यात यावी या मागण्यासाठी जलजागृती यात्रा काढून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्यापक जनमत तयार करण्यासाठी प्रयत्न करण्यात यणे ार आहेत.
नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पासाठी गेल्या अनेक वर्षपां ासून आंदोलने सुरू होती. आमदार डॉ. राहुल आहेर यांनी विधिमंडळात नार-पार संदर्भात लक्षवेधी सूचना कली. े त्यामुळे जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकल्पाला मान्यता दिल्याचे निखिल पवार यांनी सांगितले.
जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष तथा प्रकल्पाचे अभ्यासक विश्वासराव देवरे यांनी प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती दिली. जोपर्यंत ३० टीएमसी पाणी मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच ठेवला जाणार असून यणे ाऱ्या काळात गावागावात जाऊन नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाबाबत माहितीपत्रक वाटप करण्यात यणे ार असून जलजागृती यात्त सहभागी रे व्हावे, असे आवाहन देवा पाटील यांनी कले. े स्व. सूर्यनारायण काबरा परिवारातर्फे पुरुषोत्तम काबरा यांनी नार-पार-गिरणा नदी जोड प्रकल्प जलजागृती यात्स ५१०० रु रे पये मदत दिली.
या वेळी शेखर पगार, विवेक वारूळे, सुशांत कुलकर्णी, भरत पाटील, नीलेश सोनवणे, सुभाष पवार, गोकूळ निकम, विजय खैरनार, अतुल गांगुर्डे, गणेश पवार, शशिकांत अहिरे, सागर काबरा, सचिन देशमुख आदी उपस्थित होते.
मालेगावात नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्प वचनपर्ती ू चे बॅनर झळकवणाऱ्यांनी या प्रकल्पाच्या मागणीसाठी वेळोवेळी आंदोलने सुरू असताना त्यात कोणतेही योगदान दिले नाही. २००४ व २००९ च्या निवडणुकीत या प्रकल्पाबाबत टिंगलटवाळी कली, स े मितीचे सदस्य भेटायला गेले, त्या वेळी नकारात्मक भाषा वापरली गेली, असे असताना त्यांना श्रेय घेण्याचा कोणताही नैतिक अधिकार प्राप्त होत नाही. यणे ाऱ्या काळात गावागावात जाऊन मंजुरीचे श्रेय घेण्यासाठी सोंग करणाऱ्या पालकमंत्र्यांचा बुरखा फडण्यात येईल, असे निखिल पवार यांनी स्पष्ट कले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.