Maharashtra Farmer Loss: एरवी रणरणत्या ऊन्हात तापून निघणारी पिके मागील आठवड्यापासून जणू ज्वर भरल्यासारखा कोसळणाऱ्या पूर्वमोसमी पावसाच्या तडाख्यामुळे कोलमडली आहेत. हाता-तोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान बघून राज्यभरातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे मळभ दाटून आले आहे. या अस्मानी प्रकोपातून कसे सावरायचे, या विवंचनेत असणारा शेतकरी वर्ग आता मदतीसाठी राज्य सरकारकडे डोळे लावून बसला आहे. राज्यात एप्रिलच्या सुरुवातीलाच विविध जिल्ह्यांत पूर्वमोसमी पावसाने चांगलाच दणका दिला आहे. जोराचा पाऊस, गारपीट व वादळी वाऱ्यांमुळे गहू, कांदा, फळपीके, भाजीपाला अशा शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी संकटात सापडले आहेत. .तीव्र हवामानबदलांमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सामान्यतः या काळात राज्यात कमाल तापमान ३८ ते ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते; मात्र सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमान ३० ते ३४ अंशांदरम्यान खाली आले आहे. किमान तापमानही २० ते २४ अंशांच्या आसपास राहिले. उरल्यासुरल्या पिकाला आता या तापमानाचा फटका बसण्याची भिती शेतकऱ्यांनी वर्तवली आहे..पुणे, साताऱ्यात पावसाचे थैमानपुणे जिल्ह्यात शुक्रवारी सकाळपर्यंत खडकवासला परिसरात १०४ मिलीमीटर (मिमी), तर सिंहगड रस्ता भागात १०० मिमी पावसाची नोंद झाली. या अवकाळी पावसामुळे कांदा, गहू, द्राक्ष व आंबा पिकांचे मोठे नुकसान झाले. सातारा जिल्ह्यात ५४ गावांतील सुमारे २४३ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, सांगली जिल्ह्यातील पलूस, शिराळा, आटपाडी व खानापूर तालुक्यांत गारपिटीमुळे द्राक्ष, डाळिंब, आंबा बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे..Pre Monsoon Rain: नेवासा, पाथर्डी तालुक्यांत पूर्वमोसमी पावसाचा तडाखा.३६ हजार शेतकरी बाधितनाशिक जिल्ह्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पाऊस व गारपिटीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. जिल्ह्यातील ३६,४०९ शेतकरी बाधित झाले आहेत. एकूण २१,२३१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसला आहे. यात सर्वाधिक फटका फळपिके व कांदा पिकाला बसल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. बागलाण तालुक्यात सर्वाधिक नुकसान आहे. रब्बी हंगामातील उन्हाळ कांद्याचे सर्वाधिक सुमारे २१,२३१ हेक्टर क्षेत्रावर पिकाचे नुकसान झाले आहे. याशिवाय गहू, मका, टोमॅटो, कांदा बिजोत्पादन, डाळिंब, द्राक्ष, आंबा पेरू व भाजीपाला पिकांचे नुकसान आहे..अहिल्यानगरात १८ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसानअहिल्यानगर जिल्ह्यात सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे सुमारे १८ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, तब्बल ३२ हजार शेतकरी बाधित झाले आहेत. जळगाव जिल्ह्यात वादळी पाऊस व गारपिटीचा तडाखा बसून सुमारे १५ हजार हेक्टरवरील केळी, कांदा, मका व कलिंगड पिकांचे नुकसान झाले. काही ठिकाणी बंधारे फुटून जमिनीची धूप झाली आहे..मराठवाड्यात मोठे नुकसानमराठवाड्यातील परिस्थिती अधिक गंभीर आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड आणि लातूर या जिल्ह्यांत गेल्या काही दिवसांत सुमारे ५३४५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, २०९ गावांतील ८७८० शेतकरी बाधित झाले आहेत. रब्बी पिके काढणीच्या टप्प्यावर असताना पडलेल्या पावसामुळे थेट नुकसान झाले आहे. गहू व हरभरा यांसारख्या पिकांची गुणवत्ता घसरली आहे. काही ठिकाणी वीज कोसळून जनावरांच्या मृत्यूच्या घटनाही घडल्या असून, त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान अधिक वाढले आहे..विदर्भातही नुकसानीची नोंदनागपूर व अमरावती विभागात मार्च महिन्याच्या अखेरीस पूर्वमोसमी पाऊस व गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले. नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत एकूण सुमारे ११८९.४९ हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली. यामध्ये गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक ९८९.३० हेक्टर नुकसान नोंदविण्यात आले असून गहू व संत्रा ही पिके प्रामुख्याने प्रभावित झाली. अमरावती विभागात नुकसानीचे प्रमाण अधिक असून पाच जिल्ह्यांत मिळून सुमारे ११,८०० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. विशेषतः बुलढाणा, अकोला, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांना मोठा फटका बसला. त्यामुळे एकूणच नागपूर विभागाच्या तुलनेत अमरावती विभागात पूर्वमोसमी पावसामुळे अधिक नुकसान झाल्याचे दिसून येते..Unseasonal Rain: आज आणि उद्या वादळी पावसाचा अंदाज; राज्यातील ८ जिल्ह्यांमध्ये आज गारपीटीचाही अंदाज.कोकणात फळबागांना फटकाकोकण पट्ट्यात, विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात, आंबा आणि काजू या नगदी पिकांना मोठा फटका बसला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुरुवारी (ता. २) सायंकाळी पूर्वमोसमी पावसाने जोरदार तडाखा दिला. घाटपायथ्याच्या गावांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. देवगड व वैभववाडी तालुक्यांमध्ये काही काळ हलक्या सरी बरसल्या. मात्र, नंतर पावसाने रौद्र रुप धारण केले. आंबा आणि काजू बागायतदार हवामान बदलामुळे अडचणीत आले आहेत. जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि पावसाचे वातावरण संपूर्ण दिवसभर कायम राहिले. तसेच वादळी वाऱ्यांमुळे फुलगळ आणि कच्च्या फळांची गळ वाढली आहे. परिणामी उत्पादनात घट होण्याची शक्यता असून, विशेषतः निर्यातक्षम आंब्यावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो..सर्वाधिक बाधित क्षेत्र व शेतकरीजिल्हा/प्रदेश बाधित क्षेत्र (हेक्टर) बाधित शेतकरी प्रमुख पिकेनाशिक २१,२३१ ३६,४०९ कांदा, फळेअहिल्यानगर १८,००० ३२,००० विविध रब्बी पिकेजळगाव १५,००० १६,००० केळी, कांदाअमरावती ११,८०० - गहू, संत्रामराठवाडा ५,३४५ ८,७८० गहू, हरभरा.राज्यातील स्थिती राज्यभर पूर्वमोसमी पाऊस,गारपीट व वादळी वाऱ्यांचा तडाखातापमानात घट, आर्द्रतेमुळे रोगराईचा धोकामध्य महाराष्ट्र, खानदेशात सर्वाधिक नुकसानमराठवाड्यात ५३४५ हेक्टर, विदर्भात ११,८०० हेक्टर क्षेत्र बाधितफळबागा व रब्बी पिकांचे मोठे नुकसानतातडीने पंचनामे व नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी.संबंधित यंत्रणांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. नुकसानभरपाईची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करून प्रत्येक बाधित शेतकऱ्याला लवकरात लवकर दिलासा देऊ.दत्तात्रय भरणे, कृषिमंत्री.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.