Maharashtra Weather Update: राज्यात वादळी वाऱ्यांसह पावसाचे सावट हळूहळू निवळण्याचे संकेत आहेत. आज (ता. ४) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) आहे. तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. .मध्य प्रदेश पासून विदर्भापर्यंत, तसेच मराठवाड्यापासून तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. शुक्रवारी (ता. ३) सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांमध्ये ओडिशातील जर्सुगुडा येथे देशातील उच्चांकी ४०.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर राजस्थानच्या जैसलमेरमध्ये नीचांकी १६.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली..पावसाळी वातावरण आणि ढगाळ हवामान, गारपीट यामुळे राज्याच्या कमाल तापमानात घट झाली आहे. किमान तापमानात वाढ झाल्याने रात्री उकाडा कायम आहे. शुक्रवारी (ता. ३) वाशीम येथे राज्यातील उच्चांकी ३९.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर अकोला येथे ३९.१ अंश, तर सोलापूर आणि अमरावती येथे ३८ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी १५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले..Unseasonal Rain: आज आणि उद्या वादळी पावसाचा अंदाज; राज्यातील ८ जिल्ह्यांमध्ये आज गारपीटीचाही अंदाज.आज (ता. ४) मध्य महाराष्ट्रातील जळगाव, अहिल्यानगर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर, नांदेड आणि विदर्भातील अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे..शुक्रवारी (ता. ३) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमानपुणे---३६.६---१७.८धुळे---३७.०---१५.०जळगाव---३६.९---१९.६जेऊर---३४.५---१९.५कोल्हापूर---३३.१--२०.६महाबळेश्वर---२८.५---१८.०मालेगाव---३६.६---१८.८.Storm Rain Alert: वादळी पाऊस, गारपिटीचा अंदाज .नाशिक---३५.६---१८.६निफाड---३५.०---१६.५सांगली---३५.५---२०.६सातारा---३४.४---१८.०सोलापूर---३८.४---२२.०सांताक्रूझ---३१.८---२२.०डहाणू---३२.६---२१.०रत्नागिरी---३१.९---२३.१.छत्रपती संभाजीनगर---३३.२---१९.३धाराशिव---३६.६---१९.७परभणी---३५.३---२१.५परभणी (कृषी)---३४.६---१८.५अकोला---३९.१---२२.७अमरावती---३८.४---२१.१भंडारा---३१.०---२१.०बुलडाणा---३७.०---२१.२ब्रह्मपुरी---३७.२---२२.८चंद्रपूर---३६.६---२४.६.गडचिरोली---३६.२---२१.४गोंदिया---३१.४---२१.४नागपूर---३१.४---२१.४वर्धा---३७.५---२३.४वाशीम---३९.६---१९.२यवतमाळ---३७.४---२४.४.सरासरी तापमान (अंश से.)विभाग---किमान---कमालउत्तर महाराष्ट्र---१५.०---३७.०पश्चिम महाराष्ट्र---१७.८---३८.४मराठवाडा---१८.५---३६.६विदर्भ---१९.२---३९.६कोकण---२१.०---३२.६उन्हाचा चटका अधिक असलेली ठिकाणे :वाशीम ३९.६, अकोला ३९.१, सोलापूर ३८.४, अमरावती ३८.४..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.