Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

Crop insurance approved : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्ती (लोकल नॅचरल कॅलेमिटीज) या जोखीम बाबीअंतर्गत पीकविमा कंपनीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या १ लाख २ हजार ७८६ विमा पूर्वसूचना (विमादावे) स्वीकारल्या.

Team Agrowon

Parbhani News : परभणी जिल्ह्यात २०२३ च्या खरीप हंगामातील पिकांचे पावसाळ्यातील तसेच मान्सून्नोत्तर अतिवृष्टी, पूर आदी स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान झाले. पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्ती (लोकल नॅचरल कॅलेमिटीज) या जोखीम बाबीअंतर्गत पीकविमा कंपनीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या १ लाख २ हजार ७८६ विमा पूर्वसूचना (विमादावे) स्वीकारल्या.

त्यापैकी ५० हजार ८६३ शेतकऱ्यांना ३० कोटी ५५ लाख ११ हजार ८५८ एवढी विमाभरपाई मंजूर केली. परंतु अद्याप ५१ हजार ९२३ शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. त्यात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे.

परभणी जिल्ह्यात २०२३ च्या पावसाळ्यात तसेच २७ ते २९ नोव्हेंबर या कालावधी झालेल्या मान्सूनोत्तर पाऊस, अतिवृष्टी, पूर यामुळे खरिपातील सोयाबीन, तूर, कपाशी आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. पंतप्रधान पीकविमा योजनेतील स्थानिक नैसर्गिक आपत्ती (लोकल नॅचरल कॅलॅमिटीज) या जोखीम बाबींअंतर्गत पीकविमा भरपाई मिळावी यासाठी पीकविमाधारक शेतकऱ्यांनी कॉल सेंटर, पीकविमा पोर्टल तसेच ऑफलाइन पद्धतीने एकूण १ लाख ९३ हजार ९६७ पूर्वसूचना (विमा दावे) पीकविमा कंपनीकडे दाखल केल्या.

त्यापैकी १ लाख २ हजार ७८६ पूर्वसूचना स्वीकारल्या तर एकूण ९१ हजार १८१ पूर्वसूचना विविध कारणांनी नाकारल्या. दावेदार शेतकऱ्यांना डिसेंबर २०२३ अखेरपर्यंत विमा भरपाई अदा करणे आवश्यक होते. परंतु विमा कंपनीने कापूस, तूर आदी पिकांच्या नुकसानीबद्दल केवळ ५० हजार ८६३ शेतकऱ्यांना ३० कोटी ५५ लाख ११ हजार ८५८ रुपये एवढी विमा भरपाई मंजूर केली. उर्वरित ५१ हजार ९२३ शेतकरी मात्र अद्याप पीकविम्याच्या प्रतीक्षेत आहेत, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

स्थानिक नैसर्गिक आपत्ती पीकविमा वाटप स्थिती (रक्कम कोटी रुपये)

तालुका शेतकरी संख्या मंजूर रक्कम

परभणी ३८७१ ३.३२५५

जिंतूर ११५३७ ६.४३३६

सेलू ९६८३ ५.९५७८

मानवत ३१४९ २.०४३८

पाथरी ५०८३ ३.५१२२

सोनपेठ २६२१ १.४८०४

गंगाखेड ५८५७ ३.४९२४

पालम ७३८० ३.६८२६

पूर्णा १६८२ ०.६२२५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Weather Update: राज्यात पावसाचा जोर वाढणार; कोकण, विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज

Crop Insurance : सांगली जिल्ह्यात ५७ हजार हेक्टरवरील पिके विमा संरक्षित

Kharif Paisewari : पीक पैसेवारी समितीची काटेकोर अंमलबजावणी करा

Meat Ban Protest: स्वातंत्र्य दिनानिमित्त मांसविक्री बंदीच्या निर्णयाविरोधात हिंदू खाटीक समाजाचे कल्याण-डोंबिवलीत आंदोलन

Lumpy Skin : सिन्नर, निफाड तालुक्यांत ‘लम्पी’चा प्रादुर्भाव

SCROLL FOR NEXT