Bajari Cultivation  Agrowon
ॲग्रो विशेष

Bajari Cultivation : जैव संपृक्त बाजरीचे ३० एकरांवर प्रात्यक्षिक

Bajari Variety : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प येथून राष्ट्रीय स्तरावर प्रसारित झालेल्या जैव संपृक्त वाण एएचबी १२०० चे उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांच्या शेतावर प्रात्यक्षिक घेण्यात आले.

Team Agrowon

Chh. Sambhajinagar News : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प येथून राष्ट्रीय स्तरावर प्रसारित झालेल्या जैव संपृक्त वाण एएचबी १२०० चे उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांच्या शेतावर प्रात्यक्षिक घेण्यात आले. सुमारे ३० एकर क्षेत्रावर ही प्रात्यक्षिके घेण्यात आली आहेत.

त्या प्रत्याक्षिकांतर्गत सांगवी येथे एएचबी १२०० या संकरित बाजारी वाणाचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. या प्रत्याक्षिकास वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठाचे संचालक संशोधन डॉ. खिजर बेग यांनी भेट दिली व बाजरी पिकाची पाहणी केली.

त्याचप्रमाणे त्यांनी शेतकऱ्यांनी उन्हाळी बाजरीचे क्षेत्र वाढवून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊन आपल्या आहारात त्याचा समावेश करावा, असे आवाहन केले. उन्हाळी हंगामामध्ये शेतकऱ्यांना हे एक पर्यायी पीक ठरू शकते, असेही डॉ. बेग म्हणाले.

उन्हाळी बाजरीचे पीक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सोयगाव, छत्रपती संभाजीनगर, पैठण, वैजापूर, गंगापूर, फुलंब्री आदी तालुक्यांत प्रामुख्याने घेतले जाते.

या भेटीवेळी सहयोगी संचालक संशोधन डॉ. सूर्यकांत पवार, बाजरा पैदासकार डॉ. दीपक पाटील, हिमायत बाब संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. संजय पाटील, डॉ. माने आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Highest Crop Insurance Claim: वस्तुनिष्ठ कापणी प्रयोगांमुळे राज्यात सर्वाधिक पीकविमा

Zero Tillage: शून्य मशागत खरंच फायदेशीर ठरते का?

Women Farmers: ‘महिला शेतकरी’ म्हणून ओळख मिळण्याची संधी...

Sangli APMC: सांगली बाजार समितीचा निर्णय लांबणीवर

Custard Apple Farming: सीताफळात विपणनासह प्रक्रिया साखळीची गरज

SCROLL FOR NEXT