Cooperative Conference Agrowon
ॲग्रो विशेष

Cooperative Conference : पुण्यात आजपासून दुसरी सहकार महापरिषद

या महापरिषदेत सहकारी बॅंकिंग आणि साखर उद्योगासमोरील आव्हाने आणि उपाययोजनांबाबत विस्तृत चर्चा होणार आहे.

Team Agrowon

Pune News : ‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने आज (ता. १७)पासून पुण्यात दुसऱ्या सहकार महापरिषदेचे (सकाळ महाकॉन्क्लेव्ह) आयोजन करण्यात आले आहे.

या दोनदिवसीय महापरिषदेचे उद्‍घाटन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद (Sharad Pawar) पवार यांच्या हस्ते होणार आहे. तर समारोपप्रसंगी उद्या (ता. १८) केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Shah) उपस्थित राहणार आहेत.

‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी’ प्रस्तुत या सहकार महापरिषदेस ‘दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बॅंक’ आणि ‘एस. एस. इंजिनिअर्स’ यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

या महापरिषदेत सहकारी बॅंकिंग आणि साखर उद्योगासमोरील आव्हाने आणि उपाययोजनांबाबत विस्तृत चर्चा होणार आहे. तसेच केंद्र आणि राज्यातील धोरणकर्त्यांशी थेट संवाद साधता येणार आहे.

‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने यापूर्वी दोन ऑक्टोबर २०२१ पासून तीनदिवसीय सहकार महापरिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ‘सकाळ माध्यम समूहा’ने नागरी सहकारी बॅंकिंग, पतसंस्था आणि साखर उद्योग क्षेत्रातील प्रश्नांवर चर्चा घडवून त्याचा सातत्याने पाठपुरावा केला.

त्यामुळे साखर कारखान्यांचा प्राप्तिकर माफ होण्यासह सहकारी संस्थांचे विविध प्रश्न मार्गी लागण्यास मदत झाली. याच पार्श्वभूमीवर यंदा ही दुसरी सहकार महापरिषद होत आहे.

...या मान्यवरांची उपस्थिती

पुण्यातील हॉटेल टिप टॉप इंटरनॅशनल येथे आयोजित या महापरिषदेसाठी पवार व शहा यांच्यासह केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री अतुल सावे, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, सहकार आयुक्त अनिल कवडे, साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

...यांचे होणार मार्गदर्शन

या महापरिषदेत राज्यातील प्रमुख सहकारी बॅंका आणि साखर कारखान्यांचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, राष्ट्रीय साखर महासंघ, महाराष्ट्र राज्य साखर संघ, वेस्टर्न शुगर मिल असोसिएशन, राज्य सहकारी पतसंस्था, मल्टिस्टेट पतसंस्थांचे प्रमुख पदाधिकारी आणि तज्ज्ञांचा सहभाग राहणार आहे.

या वेळी सहकारी बॅंकिंग आणि साखर उद्योगाशी संबंधित विषयांवर स्वतंत्रपणे चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.

या महापरिषदेत राज्यातील नागरी सहकारी बॅंका, पतसंस्था तसेच सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने करण्यात आले आहे.

सहभागी होण्यासाठी संपर्क क्रमांक

को-ऑपरेटिव्ह बॅंकिंग महाकॉन्क्लेव्ह- ९८८१७१८८९०, ९८८१०९९०५३, ९८२०३१६२७५

साखर उद्योग महाकॉन्क्लेव्ह- ९८५०१५१००५, ९८८१०९९०५३, ९८२०३१६२७५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solar Pump Complaint : आता महावितरणच्या अॅपवर शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाची तक्रार करता येणार

Monsoon Rain: शनिवारपासून पावसाचा जोर वाढणार; कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज कायम

Rain Crop Damage : मॉन्सूनपूर्व पावसामुळे पिके, फळबागांचे २१ कोटींचे नुकसान

Irrigation Management : शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोेचले तरच प्रकल्पांचा उपयोग

Water Storage Marathwada : मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा ७९ टीएमसीवर

SCROLL FOR NEXT