Vanarai Bunds  Agrowon
ॲग्रो विशेष

Wanrai Bunds : अमरावती विभागात पूर्णत्वास आले २९०४ वनराई बंधारे

Water Bunds : अमरावती विभागात आतापर्यंत तब्बल २९०४ वनराई बंधारे बांधण्यात आले असून त्यामध्ये सर्वाधिक १३२५ बंधारे पूर्ण करीत यवतमाळ जिल्ह्याने आघाडी घेतली आहे.

Team Agrowon

Amravati News : वनराई बंधाऱ्याच्या माध्यमातून पाणी साठवण क्षमतेत वाढीसोबतच पिकाच्या एका पाण्याची सोय करण्याचे उद्दिष्ट साधले जात आहे. अमरावती विभागात आतापर्यंत तब्बल २९०४ वनराई बंधारे बांधण्यात आले असून त्यामध्ये सर्वाधिक १३२५ बंधारे पूर्ण करीत यवतमाळ जिल्ह्याने आघाडी घेतली आहे.

शेतालगत वाहणारे नाले, ओढे यातील पाणी वाहून जात असल्याने त्याचा काहीही उपयोग होत नाही. त्यामुळे पाणी साठवून राहावे याकरिता वनराई बंधाऱ्यांचा प्रयोग केला जात आहे. अमरावती विभागात सहसंचालक किसन मुळे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे.

अमरावती विभागात अकोला, वाशीम, बुलडाणा, यवतमाळ, अमरावती अशा पाच जिल्ह्यांचा समावेश होतो. या सर्वच जिल्ह्यांना वनराई बंधाऱ्यांसाठी प्रोत्साहित केले जात आहे. या उपक्रमात लोकसहभागही वाढता असल्याचे सांगण्यात आले.

त्यामुळेच आतापर्यंत विभागातील पाच जिल्ह्यात तब्बल २९०४ वनराई बंधारे पूर्णत्वास गेले आहेत. त्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यात ३९६, अकोला ३४५, वाशीम २८८, अमरावती ५५० तर यवतमाळ जिल्ह्यातील १३२५ वनराई बंधाऱ्यांचा समावेश आहे.

शेतालगत वाहणाऱ्या नाल्याचे पाणी वाहून जाते. त्या पार्श्‍वभूमीवर वनराई बंधाऱ्याच्या माध्यमातून त्याची साठवणूक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आतापर्यंत २९०४ वनराई बंधारे पूर्णत्वास गेले आहेत.
किसन मुळे, विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Lek Ladki Yojana: ‘लेक लाडकी’च्या १२५०० लाभार्थी

Farmer Innovation: शेतकऱ्यांच्या कल्पकतेला शाबासकीची थाप

War Impact on Agri: युद्धामुळे खतांच्या किंमती वाढणार?

Ahilyanagar ZP Budget: अहिल्यानगर झेडपीच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी चार कोटी

Village Mapping: गावाचे मॅपिंग नसल्याने शेतकऱ्यांची वाढली चिंता

SCROLL FOR NEXT