Cotton Cultivation News Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Cultivation : कापूस बियाण्यांची २७ लाख पाकिटे आवश्यक

खानदेशात कापसाची लागवड यंदा सुमारे २० ते २२ हजार हेक्टरने कमी होणार आहे. परंतु कापूस बियाण्यांची व खतांची उपलब्धता याबाबत प्रशासन किंवा कृषी यंत्रणा कार्यवाही करीत आहेत.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात कापसाची लागवड (Cotton Cultivation) यंदा सुमारे २० ते २२ हजार हेक्टरने कमी होणार आहे. परंतु कापूस बियाण्यांची व खतांची उपलब्धता याबाबत प्रशासन किंवा कृषी यंत्रणा कार्यवाही करीत आहेत. यंदा जळगावात सुमारे कापूस बियाण्यांच्या २७ लाख पाकिटांची गरज असणार आहे.

मागील हंगामातही २७ लाख कापूस बियाण्यांच्या पाकिटांची उपलब्धता झाली होती. परंतु त्यांचा १०० टक्के वापर झाला नव्हता. यंदाही लागवड पाच लाख ४५ हजार हेक्टरवर होऊ शकते.

मागील हंगामात (२०२२-२३) कापसाची पाच लाख ६७ हजार हेक्टरवर लागवड जळगाव जिल्ह्यात झाली होती. यंदा लागवड कमी होणार आहे. परंतु त्यात मोठी घट येणार नसल्याचे लक्षात घेऊन प्रशासनाने कार्यवाही हाती घेतली आहे.

मागील हंगामात सुमारे २७.५० लाख कापूस बियाणे पाकिटांची मागणी व तेवढीच उपलब्धता करण्यात आली होती. तर सरळ किंवा देशी वाणांच्या फक्त २५ हजार बियाणे पाकिटांचा पुरवठा झाला होता.

अधिक मागणीच्या वाणांबाबत दक्षता हवी

मागील हंगामात कृषी विभाग एचटीबीटी (हर्बीसाईड टॉलरंट बॅसिलस थुरेलेंझीस) कापूस बियाणे वाणांचा काळाबाजार रोखण्यात अपयशी ठरले होते. एक पाकिट काळ्या बाजारात तीन ते चार हजार रुपयांना शेतकऱ्यांना दिले जात होते.

जळगाव जिल्ह्यात पारोळा, अमळनेर, चोपडा, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील शहादा, तळोदा भागात अवैध बियाणे पुरवठादार सक्रिय होते.

परंतु कारवाईची संख्या कमी होती. यंदाही असाच प्रकार होण्याची शक्यता आहे. त्यात प्रशासनाने जिल्ह्यात भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. पण ही पथके किती कारवाई करतात, याकडे लक्ष आहे.

खानदेशात बीटी (बोलगार्ड २) प्रकारच्या कापूस बियाण्यांतही काही कंपनीच्या वाणांची मोठी मागणी असते. त्यात संबंधित कंपन्या कृत्रीम टंचाई निर्माण करून नफेखोरी सुरू करतात. ही नफेखोरी रोखण्याचे आव्हानही यंदा कृषी विभागासमोर आहे.

मागील वेळेस काही वाणांच्या पाकिटांसोबत कमी मागणी असलेल्या कापूस बियाणे पाकिटांची लिंकिंग काही कापूस बियाणे वितरकांनी जळगाव शहरात केली होती. पुढे शेतकऱ्यांची नाडवणूक यातून झाली. पण कृषी विभागाने जळगावात याबाबत कारवाई केली नाही. यंदा या सर्व बाबींवर लक्ष ठेवून कारवाईसत्र राबवावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

धुळ्यात १० लाख पाकिटांची मागणी

खानदेशात जळगावात कापूस बियाण्यांच्या सुमारे २७ लाख पाकिटांची आवश्यकता असेल. धुळ्यात सुमारे १० लाख आणि नंदुरबारात कापूस बियाण्यांच्या सात लाख पाकिटांची गरज असणार आहे, अशी माहिती मिळाली.

कापूस बियाण्यासंबंधी योग्य ती कार्यवाही प्रशासन करीत आहे. भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. काळाबाजारावर कठोर कारवाई केली जाईल.
विजय पवार, मोहीम अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT