Agriculture Crop Loan Agriculture
ॲग्रो विशेष

Crop Loan Disbursement : हिंगोली जिल्ह्यात पीककर्जाचे २५.९७ टक्के वाटप

Agriculture Loan Update : हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या (२०२४) खरीप हंगामात ८९१ कोटी ७७ लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट असून, सोमवार (ता. २४) अखेर २९ हजार ५६२ शेतकऱ्यांना २३१ कोटी ६० लाख ३५ हजार रुपये (२५.९७ टक्के) पीककर्ज वाटप झाले आहे.

Team Agrowon

Hingoli News : हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या (२०२४) खरीप हंगामात ८९१ कोटी ७७ लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट असून, सोमवार (ता. २४) अखेर २९ हजार ५६२ शेतकऱ्यांना २३१ कोटी ६० लाख ३५ हजार रुपये (२५.९७ टक्के) पीककर्ज वाटप झाले आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँक कर्जवाटपात आघाडीवर आहे. त्यानंतर जिल्हा बँकेचा क्रम असून व्यापारी बँका पिछाडीवर आहेत.

हिंगोली जिल्ह्यात परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ४१ शाखा आहेत. भारतीय स्टेट बँकेसह राष्ट्रीयीकृत बँकांच्या (व्यापारी बँका) ३८ शाखा, खासगी बँकांच्या ९ शाखा, महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या २३ शाखा अशा एकूण १११ शाखा आहेत. यंदाच्या खरिपात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला १४६ कोटी ७ लाख रुपये, व्यापारी बँकांना ५६७ कोटी ५३ लाख रुपये,

महाराष्ट्र ग्रामीण बँकेला १७८ कोटी १७ लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. सोमवार (ता.२४) अखेर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ११ हजार शेतकऱ्यांना ४० कोटी ८८ लाख १८ हजार रुपये, व्यापारी बँकांनी ६ हजार ५९ शेतकऱ्यांना ७२ कोटी १७ लाख रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बँकेने १२ हजार शेतकऱ्यांना ११८ कोटी रुपये (६६.६३ टक्के) पीककर्ज वाटप केले आहे.

बँकनिहाय पीककर्ज वाटप स्थिती (कोटी रुपये) सोमवार, ता.२४ अखेर

बँक उद्दिष्ट वाटप शेतकरी संख्या

जि.म.स. बँक १४६.०७ ४०.८८ १११६१

महाराष्ट्र ग्रामीण बँक १७८.१७ ११८.७१ १२३४२

भारतीय स्टेट बँक ३२०.५९ ३७.३८ ३३७२

बँक ऑफ बडोदा १५.७७ १.९५ १५६

बँक ऑफ इंडिया ४२.८२ ३.७८ २८७

बँक ऑफ महाराष्ट्रा ४४.२७ ११.२० ९५४

कॅनरा बँक १५.७१ १.०९ १०३

सेंट्रल बँक ऑफ इंडिया ८.५७ ०.८७ १०१

इंडियन बँक ४.२९ ०.५२ ६७

पंजाब नॅशनल बँक १०.०३ १.९३ १५७

युको बँक ४.५८ ०.८७ ७३

युनियन बँक ऑफ इंडिया २८.६० २.३० १६१

अॅक्सिस बँक ७.८७ ०.९६ ३७

एचडीएफसी बँक २१.४६ ४.३४ २५३

आयसीआयसीआय बँक ३२.१६ ३.९२ २५९

आयडीबीआय बँक १०.८१ ०.८७ ७९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway: ‘शक्तिपीठ’साठी ६२०० हेक्टर घेणार

Farmers Meeting: केंद्रीय कृषिमंत्री आज साधणार शेतकरी संघटनांशी संवाद

Animal and Fisheries Skill Development: कौशल्यांद्वारे पशुपालन, मत्स्योद्योगाला मिळणार गती

Agriculture Department Incorrect Structure: आस्थापना प्रमुखावर कारवाई करा

India Reservoir Storage: देशातील जलाशयांत पाणीसाठा पोहोचला ७०.३ टक्क्यांवर

SCROLL FOR NEXT