Soybean Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Compensation : सोयाबीनच्या नुकसानीपोटी २५ टक्के आगाऊ रक्कम देणार

Crop Insurance : यंदा जुलै ते सप्टेंबरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे १०४ महसूली मंडलांत अतिवृष्टी झाली. सोयाबीन पिकावर विपरीत परिणाम झाला.

Team Agrowon

Yavatmal News : यंदा जुलै ते सप्टेंबरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे १०४ महसूली मंडलांत अतिवृष्टी झाली. सोयाबीन पिकावर विपरीत परिणाम झाला. त्यामुळे विमाधारक शेतकऱ्यांना नुकसानीच्या २५ टक्के आगाऊ रक्कम देण्याचे आदेश विमा कंपनीला जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

यंदा जिल्ह्यात मॉन्सूनचे आगमन उशिराने झाले. तरी कापसाचा साडेचार लाख हेक्टर, तर सोयाबीनचा अडीच लाख हेक्टरवर लागवडी झाली आहे. मात्र, जुलै महिन्यांत मुसळधार पाऊस झाला. जुलै ते ४ सप्टेंबर या कालावधीत कोसळलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील १०४ महसुली मंडलांत अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली.

सततचा पाऊस आणि ढगफुटीसदृश पावसाचा फटका सोयाबीन पिकाला बसला. तालुका कृषी अधिकारी, रिलायन्स जनरल इन्शुरस लिमिटेड मुंबई या कंपनीचे प्रतिनिधी आणि शेतकऱ्यांनी संयुक्त पाहणी केली. त्यानुसार जिल्ह्यातील ११० महसूल मंडलामध्ये सोयाबीन पिकाचे उत्पादन मागील सात वर्षांच्या सरासरीच्या ५० टक्केपेक्षा कमी असल्याचे निदर्शनास आले आहे.

विमा क्षेत्रातील पिकांसाठी संभाव्य नुकसानभरपाई रकमेच्या २५ टक्के आगाऊ रक्कम विमाधारक शेतकऱ्यांना देण्याची तरतूद केंद्र शासनाच्या १७ ऑगस्ट २०२० च्या सुधारित मार्गदर्शक सूचनेनुसार देण्यात आले आहे. दरम्यान, २७ सप्टेंबर रोजी झालेल्या जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीच्या सभेत नुकसानभरपाई देण्याबाबत निर्देश देण्यात आले आहे.

त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. पंकजा आशिया यांनी मे. रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, मुंबई यांनी पत्र पाठवून नुकसानभरपाई देण्याचे आदेश जारी केले. हंगामाच्या शेवटी उत्पादनाच्या आधारे निश्‍चित होणाऱ्या नुकसानभरपाईसाठी पात्र राहणार आहे. नुकसानभरपाईची आगाऊ रक्कम ही अंतिम येणाऱ्या नुकसानभरपाईतून समायोजित केली जाणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bamboo Plantation: जलसंधारणाच्या कामावर उभे राहिले ‘बांबू बेट’

2014 Election Promises BJP: भाजपने आश्वासनांची पूर्तता करावी : खासदार अमर काळे

Farm Loan Waiver: १२ लाख शेतकऱ्यांची अट टाकून अडवणूक; कर्जमाफीवरून कैलास पाटील यांचा विधानसभेत आरोप

Sugarcane Payment Issue: ‘गोकुळ शुगर’च्या थकीत ऊसबिलांसाठी उद्या कल्याणशेट्टी यांच्या घरासमोर ठिय्या

National Krishi Shakti Award: डॉ. वसंत ढिकले यांना राष्ट्रीय ‘कृषी शक्ती पुरस्कार’

SCROLL FOR NEXT