Flower Varieties Agrowon
ॲग्रो विशेष

Flowers Variety : फुलांचे २५ वाण प्रसारित, तर १४ वाण प्रसारणाच्या मार्गावर

25 New Flower Varieties : जागतिकीकरणामुळे विविध फुलांना मागणी वाढत असून, बाजारपेठेच्या सुंगधी आणि शोभिवंत फुलांच्या मागणीनुसार राष्ट्रीय पुष्पसंशोधन संचालनालयाच्या वतीने गेल्या १५ वर्षांत २५ फुलांचे नवीन वाण शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिले आहेत.

गणेश कोरे

Pune News : शेतीमध्ये फळे, भाजीपाल्यांबरोबरच फुलशेतीला विशेष महत्त्व आहे. जागतिकीकरणामुळे विविध फुलांना मागणी वाढत असून, बाजारपेठेच्या सुंगधी आणि शोभिवंत फुलांच्या मागणीनुसार राष्ट्रीय पुष्पसंशोधन संचालनालयाच्या वतीने गेल्या १५ वर्षांत २५ फुलांचे नवीन वाण शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिले आहेत. तर १४ वाण प्रसारणाच्या मार्गावर असून, लवकरच त्यांचे नामकरण करून प्रसारित केले जाणार असल्याची माहिती संचालनालयाचे संचालक डॉ. के. व्ही. प्रसाद यांनी दिली.

पुष्पसंशोधन संचालनालयाच्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्त डॉ. प्रसाद यांनी ‘ॲग्रोवन’ला माहिती दिली. डॉ. प्रसाद म्हणाले, की १५ वर्षांपूर्वी पुण्यात राष्ट्रीय पुष्पसंशोधन संचालनालयाची स्थापना झाली. कृषी महाविद्यालयातील १२ एकर जागा मिळाल्यानंतर, या ठिकाणी एका खोलीत संस्थेचे कार्यालय सुरू झाले.

यानंतर मांजरी येथे संस्थेला ५० एकरांपेक्षा अधिक मोठी जागा शासनाने उपलब्ध करून दिली. जागा ताब्यात मिळण्यासाठीची कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर जागेची मशागत, पाण्याची उपलब्धता, अत्याधुनिक इमारत, प्रयोगशाळा उभारणीच्या कार्यकाळात, देशभरातील विविध फुलांच्या वाणांचे मातृवृक्षांची लागवड करण्यात आली. यानंतर संशोधनाला सुरुवात झाली.

या संशोधन प्रकल्पामध्ये शेवंतीच्या देशभरातील १५० पेक्षा अधिक विविधरंगी वाण, गुलाब २१२, गुलछडीचे २५ वाण, झेंडूचे १२ वाण आणि ग्लॅडिओलससच्या ८१ वाणांची लागवड करून संशोधन सुरू आहे. प्रत्यक्ष लागवड आणि संशोधनातून विविध फुलांचे ८ वाण प्रसारित झाले आहेत. तर १० वाण प्रसारणाच्या मार्गावर आहेत, असे डॉ. प्रसाद यांनी सांगितले.

फुलाचे नाव --- प्रसारित वाण --- प्रसारणाच्या मार्गावरील वाण

शेवंती --- ४ --- ४

गुलछडी --- १ --- २

झेंडू --- १ --- २

ग्लॅडिओलस --- २ --- २

गुलाब ---- ३ --- २

ॲस्टर --- १५ --- २

प्रसारित वाणांची नावे

शेवंती ---- पल्लवी, मेघा, स्वर्णा, स्वर्णबिंदू

गुलछडी ---- सह्याद्री वामण

झेंडू --- डिएफआर एम -२, एम -१२, एम -२६

ग्लॅडिओलस --- डीएफआर - अमृत, डीएफआर सोहम

ॲस्टर ---- डीएफआर - एए १, एए ११, एए १७

उपपदार्थांची निर्मिती

फूल संशोधनाबरोबरच शेतकऱ्यांना फूल प्रक्रिया उद्योगांतून अधिकचा लाभ व्हावा, यासाठी गुलाब लिप बाम, गुलाब सरबत, गुलाब चहा, डीएफआर मध, गुलाब मध, रोमिहो कुकीज, डीएफआर महक (अत्तर) आदी उपपदार्थांची निर्मिती केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Advisory: पिकांमधील अन्नद्रव्ये कमतरता, कीड-रोग निदानासाठी प्रक्षेत्र भेट

Rural Healthcare Development: आरोग्य सेवेला बळकटी

Supreme Court: निवडणूक आयुक्तांना कायदेशीर संरक्षण देणाऱ्या कायद्याची सुप्रीम कोर्टाकडून पडताळणी; केंद्र सरकारला नोटीस

Vegetable Cultivation: नगदी वाल पिकामुळे बळीराजाला आधार

UMED Mission: उमेद अभियानात काम करणाऱ्या महिलांना आता नवी ओळख, 'ग्रामसखी' या नावाने ओळखले जाणार

SCROLL FOR NEXT