Banana Flower : आरोग्यदायी केळीचे फूल

Nutritional value : आधुनिक आहारशास्त्रात केळीच्या फुलाला ‘सुपरफूड' म्हणतात. केळीचे फूल पोषणमुल्यांनी समृद्ध आहे, तसेच पर्यावरणीय दृष्टिकोनातूनही शाश्वत आहे.
Banana Flower
Banana FlowerAgrowon
Published on
Updated on

सचिन गिरी, डॉ. राजेश क्षीरसागर

Health Benefits of Banana Flower : आधुनिक आहारशास्त्रात केळीच्या फुलाला ‘सुपरफूड' म्हणतात. केळीचे फूल पोषणमुल्यांनी समृद्ध आहे, तसेच पर्यावरणीय दृष्टिकोनातूनही शाश्वत आहे. यामुळे केळी फुलाचा आहारात समावेश केल्याने संपूर्ण शरीरस्वास्थ्यावर सकारात्मक परिणाम होतो.

केळीचे फूल हे पोषणमुल्यांनी समृद्ध असून, त्याला भारतीय पारंपरिक आहारात आणि औषधीय उपचारांमध्ये विशेष स्थान आहे. केळीच्या फुलांमध्ये असंख्य पोषणतत्त्वे आणि आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण घटक भरपूर प्रमाणात असतात. यात जीवनसत्त्वे, खनिजे, तंतूमय घटक आणि अँटिऑक्सिडंट्सचा समृद्ध स्रोत असल्यामुळे शरीराला आवश्यक पोषणतत्त्वे सहजपणे उपलब्ध होतात.

Banana Flower
Flower Market : बारामतीत जळोची येथे फूल मार्केट सुरू

यामध्ये जीवनसत्त्वे क, अ, बी१, बी२,बी ६ आणि फोलेट मोठ्या प्रमाणात आहे. ही जीवनसत्त्वे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि मज्जासंस्थेच्या कार्यक्षमतेसाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. पोटॅशिअम, लोह, फॉस्फरस, कॅल्शिअम, जस्त, आणि मॅग्नेशिअम यांचा पुरवठा होतो. लोहामुळे रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी सुधारते. पोटॅशिअम हृदयाचे आरोग्य टिकवून ठेवण्यास मदत करते.

मानवी आहारासाठी उपयुक्त तंतूमय घटक मोठ्या प्रमाणात असतात.जे पचनक्रियेसाठी अत्यंत उपयुक्त आहे. यामुळे पचनसंस्था सुदृढ राहते, बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांपासून आराम मिळतो. कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करण्यात मदत होते. फिनॉल्स, फ्लेवोनॉइड्स, आणि टॅनिन्ससारखे अँटिऑक्सिडंट घटक मुबलक प्रमाणात असतात. हे घटक शरीरात मुक्त रॅडिकल्सशी लढण्याचे कार्य करतात, ज्यामुळे त्वचेचे वृद्धत्व कमी होते. शरीराला विविध आजारांपासून संरक्षण मिळते. अँटिऑक्सिडंट्समुळे हृदयाच्या आरोग्यास लाभ होतो. कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका कमी होतो.

औषधी गुणधर्म

मधुमेह असलेल्या लोकांसाठी हे विशेष फायदेशीर ठरते. यामधील हायपोग्लायसेमिक गुणधर्म रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. पॉलीफेनॉल्समुळे कर्करोगाविरुद्ध लढा देणे शक्य होते. हे शरीरातील घातक पेशींच्या वाढीस अडथळा निर्माण करते.

हृदयविकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी केळीचे फूल उपयोगी ठरते. यामधील पोटॅशिअम उच्च रक्तदाब कमी करण्यास मदत करत असल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते. याशिवाय, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी या फुलातील अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे महत्त्वाची भूमिका बजावतात.

महिलांसाठी हे फूल उपयुक्त आहे. मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या त्रासांना कमी करण्यासाठी तसेच अतिरिक्त रक्तस्राव रोखण्यासाठी केळीचे फूल प्रभावी आहे. कमी कॅलरी आणि जास्त तंतूमय घटकांमुळे वजन कमी करण्याच्यादृष्टीने हे फायदेशीर आहे.

Banana Flower
Flower Market : फुलांचे दर कोमजले; उत्पादकांना फटका

औद्योगिक उपयोग

खाद्य प्रक्रिया उद्योगात याचा उपयोग लोणची, चटणी आणि आंबवलेले पदार्थ तयार करण्यासाठी होतो. औषधनिर्मितीमध्ये याचा वापर केला जातो. केळीच्या फुलांपासून तयार केलेले अर्क विविध औषधांमध्ये वापरले जातात. पर्यावरणपूरकदृष्टीने उपयोग महत्त्वाचा आहे. याचा जैवइंधन आणि नैसर्गिक खत तयार करण्यासाठी उपयोग केला जातो.

पोषण गुणधर्म प्रमाण

ऊर्जा (कॅलरी) ५१.००

प्रथिने (ग्रॅम) १.६०

फॅट (ग्रॅम) ०.६०

कार्बोहायड्रेट्स (ग्रॅम) ९.९०

तंतूमय घटक (ग्रॅम) ५.७०

कॅल्शिअम (मि.ग्रॅ) ५६.००

फॉस्फरस (मि.ग्रॅ) ७३.३०

लोह (मि.ग्रॅ) ५६.४०

तांबे (मि.ग्रॅ) १३.००

आहारातील महत्त्व

केळी फुलापासून भाजी, वडे, सूप, लोणची आणि चटणी तयार करतात.

प्रथिने आणि आवश्यक अमिनो ॲसिड्स मुबलक प्रमाणात आढळतात, ज्यामुळे शाकाहारी लोकांसाठी हे प्रथिनांचा एक उत्तम स्रोत ठरते. हे सहज पचणारे असल्यामुळे लहान मुलांच्या आहारातही याचा समावेश करणे फायदेशीर ठरते.

फुलातील नैसर्गिक साखर आणि अँटिऑक्सिडंट्स मधुमेहींसाठी उपयुक्त ठरतात, कारण ते रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यास मदत करतात.

केळीचे फूल जखम भरून येण्यासाठी, सूज कमी करण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयोगी ठरते.

तंतूमय घटकांच्यामुळे पचनसंस्थेस चालना मिळते, पचनक्रिया सुधारते. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते.

- सचिन गिरी, ८३२९२२९८२८

(अन्नतंत्र महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ,परभणी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com