Milk Rate Government agrowon
ॲग्रो विशेष

Milk Rate : दूध उत्पादकांची रोज २५ कोटी रुपयांची लूट

Dairy Business : शेतकऱ्यांच्या नावाखाली दूध व्यवसाय थाटणाऱ्या डेअरी लॉबीने दुधाचे दर पाडले आहेत.

Team Agrowon

Pune News : शेतकऱ्यांच्या नावाखाली दूध व्यवसाय थाटणाऱ्या डेअरी लॉबीने दुधाचे दर पाडले आहेत. त्यातून शेतकऱ्यांची रोज २५ कोटी रुपयांची लूट केली जाते आहे. दूधदर पाडापाडी प्रकरणाची राज्य सरकारने चौकशी करावी, अशी मागणी शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेने केली आहे.

खासगी व सहकारी डेअरीचालकांचे नेतृत्व करणारा राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघ नेहमी शेतकरी विरोधी भूमिका घेतो. या संघात शेतकऱ्यांना स्थान दिले जात नाही. शासनदेखील दुधाबाबत निर्णय घेताना शेतकऱ्यांशी चर्चा करीत नाही तसेच दुग्धविषयक धोरण समित्यांमध्ये शेतकरी प्रतिनिधींचा समावेश केला जात नाही.

शेतकऱ्यांच्या नावाखाली दूधसंघ चालवले जातात. परंतु लूट शेतकऱ्यांचीच केली जाते. येत्या निवडणुकांमध्ये राज्यातील दूध उत्पादक शेतकरी पुन्हा धडा शिकवतील, असा इशारा मंचचे अध्यक्ष विठ्ठल पवार यांनी दिला आहे.

शेतकऱ्यांच्या वतीने मंचाने मुख्यमंत्र्यांना निवेदनदेखील पाठवले होते. गायीच्या दुधासाठी शेतकऱ्यांना ४८ रुपये; तर म्हशीच्या दुधाला ५८ रुपये दर मिळावा, पशुधनासाठी चारा छावण्या उघडाव्यात, पशुसंवर्धन मंत्र्यांनी प्रथम गायीच्या दुधाला ३५ रुपये दर देण्याचे जाहीर केले होते. मात्र, त्यानंतर पुन्हा ३४ रुपये दराचा आदेश का काढला गेला याची चौकशी करावी, कृषी विद्यापीठांनी दुधाचा उत्पादन खर्च काढलेला आहे.

त्या अभ्यासावर आधारित दुधाचे दर लागू करण्यासाठी शासनाने आदेश द्यावेत, अशा मागण्या या निवेदनात करण्यात आल्या. सरकारने आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचे मंचाचे म्हणणे आहे.

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर १७ ते १९ रुपये अनुदान द्यावे. ते त्यांच्या थेट बॅंक खात्यात जमा करावे. कोणत्याही संस्थेला अनुदान दिल्यास आम्ही आंदोलन करू किंवा न्यायालयात धाव घेऊ, असा इशारा मंचने दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rice Leaf Blight: भातावरील करप्याचे कारण ओळखूनच उपाय करा

Crop Damage: पाऊस पडला तरी पिकांचे नुकसान भरून येणार नाही

Crop Loan Burden : कर्जाआधीच शेतकऱ्यांच्या खिशाला झटका!

Automated Weather Stations: आजऱ्यात हवामान केंद्रांसाठी ६५ ग्रामपंचायतींची सहमती

Maize Threshing: बागायती मका पीक मळणीवर

SCROLL FOR NEXT