Sangli APMC Agrowon
ॲग्रो विशेष

Sangli Market Committee : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे २५ कोटींचे अंदाजपत्रक

Market Committee Budget : कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न सुरू आहेत. सन २०२४-२५ आर्थिक वर्षात विविध करांच्या माध्यमातून २५ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक मांडण्यात आले.

Team Agrowon

Sangli News : कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न सुरू आहेत. सन २०२४-२५ आर्थिक वर्षात विविध करांच्या माध्यमातून २५ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक मांडण्यात आले. बांधकाम, कर्मचारी वेतनासह विविध खर्च वजा जाता १३ कोटी ४० लाख रुपयांचे शिलकी अंदाजपत्रक सभापती सुजय शिंदे यांनी सादर केले.

संचालक मंडळाच्या बैठकीत अंदाजपत्रक सादर केल्याची माहिती सभापती शिंदे यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘बाजार समितीचे २५ कोटी ५० लाख ९८ हजार ७०० रुपयांचे उत्पन्न मिळण्याचा अंदाज आहे.

त्यानुसार १३ कोटी ४० लाख सात हजार ७८९ रुपयांचे शिल्लक अंदाजपत्रक सादर केले आहे. आर्थिक वर्षातील खर्चामध्ये बांधकाम, जमीन खरेदीसाठी सहा कोटी २१ लाख २६ हजार रुपयांची तरतूद केली आहे.

बाजार समितीकडील कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या वेतनावर चार कोटी ६१ लाख ७४ हजार ५०० रुपये आणि विविध भत्त्यांसाठी दोन कोटी २४ लाख ८३ हजार ९५ रुपयांची तरतूद अंदाजपत्रकात केली आहे. ’’

सभापती शिंदे म्हणाले, की या ठिकाणी आंध्र, तमिळनाडू, कर्नाटक येथून हळदीची आवक होते. बेदाण्याची आवक विविध ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात होते. गत वर्षी समितीचे उत्पन्न १४ कोटी रुपये झाले होते. उत्पन्न वाढवण्यासाठी संचालक मंडळाचे प्रयत्न सुरू आहेत. समितीच्या आवारातील दुकान गाळे भाडेवाढ दोन हजारांवरून एक लाख २५ हजार रुपये करण्याचा निर्णय झाला आहे. त्याशिवाय अधिशुल्कही आकारण्यात येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT