Jal Jivan Mission Agrowon
ॲग्रो विशेष

Jal Jivan Mission : जल जीवन मिशनअंतर्गत २४६ पाणी योजना कार्यान्वित

Water Supply Scheme : जिल्ह्यात जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत एकूण ५९४ पाणी पुरवठा योजनांचा कृती आराखडा मंजूर करण्यात आला आहे.

Team Agrowon

Dharashiv News : जिल्ह्यात जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत एकूण ५९४ पाणी पुरवठा योजनांचा कृती आराखडा मंजूर करण्यात आला आहे. योजनेतून गावांतील नागरिकांना प्रती माणशी दररोज ५५ लिटर पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे.

यातील २४६ योजनांना शंभर टक्के कार्यान्वित होऊन नागरिकांना पाणी पुरवठा होत आहे. मात्र, काही योजनांना विलंबाचे ग्रहण लागले असून योजनेतील कामांसाठी कमालीचा उशीर झाला आहे. यामुळे जिल्हा परिषदेने मुदतीत काम करणाऱ्या कंत्राटदारांविरुद्ध दंडात्मक कारवाईचे हत्यार उगारले असून कंत्राटदारांना योजनेच्या अंदाजपत्रक किंमतीच्या अर्धा ते सहा टक्क्यापर्यंत दंड ठोठावण्यात येत आहे.

कार्यान्वित झालेल्या योजनांचा देखभाल व दुरुस्तीचा कार्यभार संबंधित ग्रामपंचायतींना हस्तांतरित करण्यात आला आहे. उर्वरित ३४८ योजनांपैकी ११५ योजना ७६ ते १०० टक्के पूर्ण झाल्या आहे.

१३५ योजना ५१ ते ७५ टक्के पूर्ण झाल्या असून, ७० योजना २६ ते ५० टक्के, तर २७ योजना २५ टक्क्यांपर्यंत पूर्ण झाल्या आहेत. कोणतीही तांत्रिक अडचण नसतानाही मुदतीत कामे पूर्ण न झाल्यास संबंधित ठेकेदारांना दंड ठोठावण्यात येत आहे.

जाणीवपूर्वक काम टाळणाऱ्या ठेकेदारांचे कंत्राट रद्द करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. अशा ठेकेदारांची सुरक्षा अनामत रक्कमही जप्त करण्याचा निर्णय घेतला आहे. योजनांसाठी आवश्यक जागा उशिराने उपलब्ध झाल्यामुळे ६९ गावांतील पाणीपुरवठा योजना उशिरा सुरू झाल्या आहेत.

यासोबत काही योजनांचा उद्भव हा महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेमधील प्रस्तावित जलस्रोतांवर अवलंबून असल्याने त्या विहिरी अर्धवट स्थितीत आहेत. यामुळे काही योजनांची कामे रखडल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता मोहन सरवदे यांनी दिली.

३८ विहिरीला पाणी लागले नाही

सुमारे ३८ योजनांचे जलस्रोत अयशस्वी ठरल्याने नव्याने प्रमाणित जलस्रोत उपलब्ध करून देण्याची गरज निर्माण झाली आहे. परिणामी,अशा योजनांचे काम देखील विलंबाने सुरू करण्यात आले आहे. संबंधित योजनांना आवश्यक मुदतवाढ दिली असून कामांना गती देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.

कंत्राटदाकडून वेळेत काम पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केला जात असून, उशीर करणाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे. मिशनअंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक गावात शुद्ध पाणीपुरवठा पोहोचवण्याच्या उद्देशाने प्रशासन पूर्णपणे कटिबद्ध असल्याची माहिती कार्यकारी अभियंता सरवदे यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT