Mahavitran Electricity agrowon
ॲग्रो विशेष

Mahavitran Chatbot Service : ‘महावितरण’ची ग्राहकांसाठी २४ तास ‘चॅटबॉट’ सेवा

Mahavitran : नवीन वीजजोडणी, वीजबिल भरणा, तक्रार करता येणार

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Electricity : पुणे : ‘महावितरण’ने वीजग्राहकांसाठी ऑनलाइनद्वारे घरबसल्या एका क्लिकवर सर्व सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून वीजग्राहकांच्या संवादपर मदतीसाठी ‘ऊर्जा चॅटबॉट’ चोवीस तास ‘महावितरण’च्या संकेतस्थळ व मोबाईल अॅपवर उपलब्ध केले आहे.

इंग्रजी व मराठी भाषेतील या चॅटबॉटद्वारे ‘महावितरण’च्या विविध सेवांबाबत ग्राहकांना प्रश्न विचारता येतील. तसेच नवीन वीजजोडणी, वीजबिल भरणा, तक्रार निवारण आदींबाबत माहिती घेण्याची सोय उपलब्ध आहे.

‘महावितरण’च्या वीजसेवेसंदभांत माहिती कुठे विचारावी आणि या सेवांचा घरबसल्या लाभ कसा घ्यावा, हा प्रश्न आता संपुष्टात आला आहे. ग्राहकसेवांबाबत थेट प्रश्न विचारून विविध सेवांचा लाभ व तक्रारी नोंदविण्यासाठी हे चॅटबॉट विकसित केले आहे. नवीन वीजजोडणी, त्यासाठी केलेल्या अर्जाची सद्यःस्थिती, वीजबिल भरणा किंवा वीजबिलाचा तपशील, जलद वीजबिल भरणा, मोबाईल क्रमांक व ई-मेलची
नोंदणी, इतर विविध शुल्काचा ऑनलाइन भरणा, स्वतः मीटर वाचन व सबमिशन, गो-ग्रीन नोंदणी, वीजवापर व बिलाचे कॅलक्युलेटर आदींबाबत वीजग्राहकांना ‘ऊर्जा चॅटबॉट’ थेट मदत करीत आहे.


‘महावितरण’च्या वीजसेवेबाबत माहिती हवी असल्यास 'ऊर्जा'च्या माध्यमातून संबंधित सेवा ग्राहकांसाठी थेट ऑनलाइन उपलब्ध होणार आहे. संबंधित सेवेची लिंक ग्राहकांना या चॅटबॉटमधूनच मिळणार आहे. वीजपुरवठा खंडित होणे, इतर तक्रारींबाबत संपूर्ण माहिती वीजग्राहकांना उपलब्ध होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: मक्याचा बाजार स्थिर; कापूस दर स्थिर, टोमॅटोमध्ये काहीसे चढ उतार, तर डाळिंब व केळीला चांगली मागणी कायम

Mhaisal Lift Irrigation : ‘म्हैसाळ’साठी सौरऊर्जा प्रकल्पाचा नव्या वर्षात प्रारंभ

Wildlife Crop Damage : शाहूवाडीत वन्यप्राण्यांचा धुमाकूळ, शेतीचे नुकसान

Agriculture Electricity : कृषिपंपांच्या वीज संयोजनासाठी प्रतीक्षा कायम

Monsoon Rain Update : राज्यात पावसाचा जोर वाढणार; पुढील पाच दिवसांचा अंदाज जाहीर

SCROLL FOR NEXT