Urja Bio System : शाश्‍वत ऊर्जेसाठी ‘ऊर्जा बायो सिस्टिम प्रा. लि.’ची साथ

Sustainable Energy : प्रामाणिकपणा, गुणवत्ता, कष्ट या बळावर गजानन रूस्तुमराव पाटील यांनी हजारो शेतकरी, व्यावसायिक आणि उद्योगांना बायोगॅसच्या माध्यमातून शाश्‍वत ऊर्जा मिळवून दिली आहे. कंपनीच्या उपक्रमांना शेतकरी, व्यावसायिकांनी प्रामाणिकपणे साथ दिल्यामुळे भारतातील पहिल्या तीन कंपन्यांमध्ये ‘ऊर्जा बायो सिस्टिम प्रा. लि.’ कंपनीची गणना होते.
Urja Bio System Pvt. Ltd
Urja Bio System Pvt. LtdAgrowon

'Urja Bio System Pvt. Ltd.'s : सावरगाव डुकरे (ता. चिखली, जि. बुलडाणा) या गावातील शेतकरी कुटुंबातील गजानन रुस्तुमराव पाटील याचे बालपण गेले. त्यांचे वडील प्राथमिक शिक्षक आणि आई गृहिणी होती. गजानन पाटील यांना घरची कोणतीही औद्योगिक पार्श्‍वभूमी नव्हती. त्यांनी इंग्लंडच्या ‘न्यू कॅस्टल अपॉन टायन’ या नामांकित विद्यापीठात ‘घनकचरा व्यवस्थापन व पर्यावरण शास्त्रात’ पदव्युत्तर शिक्षण घेतले. प्रामाणिकपणा, गुणवत्ता, कष्ट या बळावर त्यांनी हजारो शेतकरी, व्यावसायिक आणि उद्योगांना बायोगॅसच्या माध्यमातून शाश्‍वत ऊर्जा मिळवून दिली.

चार लाख रुपये भांडवलावर २००६ मध्ये ‘ऊर्जा बायो सिस्टिम’ कंपनीची सुरुवात केली. आज या कंपनीची वार्षिक उलाढाल कोट्यावधी रुपयांची आहे. त्यांच्या पत्नी गौरी गजानन मोरे- पाटील या ‘एमएससी’ कृषी पदवीधर असून त्याही कंपनीच्या भागीदार आहेत. गजानन पाटील यांनी इंग्लंडमधील सिमेन्स कंपनीत पर्यावरण अभियंता तसेच लंडन महापालिकेत घनकचरा व्यवस्थापन क्षेत्रात काम केले. तेथील अनुभव घेऊन २००६ मध्ये गजानन पाटील भारतात परत आले.

कंपनीची उभारणी :
गजानन पाटील यांना बालपणापासून शेतकरी, व्यावसायिकांच्या प्रश्नांची जाण होती. उच्च शिक्षणाचा फायदा शेतकरी, व्यावसायिकांना होईल या उद्देशाने भारतात परतल्यावर त्यांनी ‘ऊर्जा बायो सिस्टिम प्रा. लि.’ कंपनीची उभारणी केली. कंपनीतर्फे शेतकऱ्यांना शाश्‍वत बायोगॅस, वीज आणि सेंद्रिय खताच्या उपलब्धतेसाठी प्रकल्प उभा करून दिला जातो. पहिल्यांदा घनकचऱ्यापासून ऊर्जा, सेंद्रिय खत निर्मिती करू शकतो यावर शेतकऱ्यांचा विश्‍वास नव्हता. कंपनी स्थापनेनंतर अकरा महिन्यांनी सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी प्रकाश मांजरे यांचे पहिले काम कंपनीला मिळाले.

तेथे पन्नास गाईंपासून उपलब्ध होणाऱ्या शेणापासून १० किलोवॉट वीज निर्मितीचा प्रकल्प कार्यान्वित झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषणात अनेक वेळा ‘स्वच्छ भारत मिशन’, ‘गोबरधन’ आणि बायोसीएनजी या विषयावर बोलत असल्याने बायोगॅसचे महत्त्व देशातील नागरिकांना समजू लागले आहे. कंपनीने शाश्‍वत ऊर्जेबाबत मांडलेले मुद्दे शेतकऱ्यांना पटू लागले. कंपनीच्या उपक्रमांना शेतकरी, व्यावसायिकांनी प्रामाणिकपणे साथ दिली. यामुळे भारतातील पहिल्या तीन कंपन्यांमध्ये ‘ऊर्जा बायो सिस्टिम प्रा. लि.’ कंपनीची गणना होते.

Urja Bio System Pvt. Ltd
Sustainable Technology : सक्षम शेतीसाठी ‘इकोजेन’चे शाश्‍वत तंत्रज्ञान

विजेचे वाढते दर आणि वीज कपात होत असल्याने शेतकऱ्यांना शाश्‍वत ऊर्जा मिळत नाही. उत्पादन खर्चाच्या मानाने शेतीतील नफा कमी होत आहे. जमिनीची गुणवत्ता ढासळल्याने पीक उत्पानक्षमतेवर परिणाम झाला आहे. या गोष्टींचा अभ्यास करून कंपनीतर्फे शेतकरी, व्यावसायिकांना शाश्वत ऊर्जा निर्मिती प्रकल्पाबाबत मार्गदर्शनाचे काम सुरू आहे.

कंपनीच्या माध्यमातून पंधरा हजार शेतकऱ्यांच्या घरी घरगुती बायोगॅस सुरू केल्याने इंधन खर्च वाचला. त्यासोबत द्रवरूप सेंद्रिय खताची उपलब्धता झाली. डेअरी, पोल्ट्री फार्ममध्ये प्रकल्प उभारल्याने १० ते २०० हॉर्स पॅावर विद्युत ऊर्जा निर्मिती झाली. अपारंपरिक ऊर्जा, सेंद्रिय स्वरूपात द्रव खत आणि दाणेदार स्फुरदयुक्त खत शेतकऱ्यांना देऊन ‘शेती वाचवा, शेतीची गुणवत्ता वाढवा’ यासाठी कंपनी कार्यरत आहे.

कंपनीला सुरुवातीला बॅंकांनी कर्ज दिले नव्हते. परंतु गजानन पाटील यांनी भाऊ, नातेवाईक यांच्याकडून मदत घेऊन कंपनीचा प्रकल्प उभा करायला सुरुवात केली. याबाबत पाटील म्हणाले, की प्रकल्प उभारताना शेतकरी, व्यावसायिकांना आम्ही प्रामाणिकपणे सांगायचो की आमच्याकडे गुणवत्ता आणि प्रामाणिकपणा आहे, परंतु भांडवल नाही,

तुम्ही आगाऊ रक्कम दिली तर तुमच्या अपेक्षेनुसार लगेच प्रकल्प उभा करता येतील. त्या वेळी शेतकरी व व्यावसायिकांनी आम्हाला चांगली साथ दिली. ग्राहकांची गरज व आर्थिक क्षमतेनुसार प्रकल्प उभारले जातात. ‘घरगुती बायोगॅस’साठी फक्त चाळीस हजार रुपये गुंतवणूक आहे. पोल्ट्री, डेअरी फार्मसाठी क्षमतेनुसार पाच लाख ते दोन कोटींपर्यंत प्रकल्पाची गुंतवणूक होते.

Urja Bio System Pvt. Ltd
Sustainable Development : एफपीओ : शाश्‍वत विकासाची दिशा

कंपनी सध्या घरगुती बायोगॅस प्रकल्प, बायोगॅसपासून विद्युत निर्मिती, बायोगॅसपासून बायोसीएनजी, बायोगॅसपासून ईव्ही चार्जिंग स्टेशन, फॉस्फेटयुक्त दाणेदार शेणखत, बायोगॅस स्लरी, बायोगॅसवर चालणारे क्षीतगृह, बायोगॅस वापरून एलपीजी/ कोळसा रिप्लेसमेंट या प्रकल्पांची उभारणी करते.

ज्या ठिकाणी ओला कुजणाऱ्या कचऱ्याची निर्मिती होते, त्या सर्व ठिकाणी बायोगॅस निर्मितीला संधी आहे. उदा. डेअरी फार्म (५० ते ५०० गायी), मोठे पोल्ट्री फार्म (वीस हजारांहून अधिक कोंबड्यांची संख्या), अन्नदान करणारी धार्मिक स्थळे, उद्योग समूहाचे कॅन्टीन, शैक्षणिक संस्था, हॉस्पिटल, गाव, नगरपालिका, महानगरपालिका, कत्तलखाने, कृषी उत्पन्न बाजार समित्या, टाऊनशिप, ५०० फ्लॅटची सोसायटी, मंगल कार्यालय, रिसॉर्ट, हॉटेल, साखर कारखाने, अन्न प्रक्रिया कारखाने इत्यादी

भविष्यातील उपक्रम :

ग्रामीण भागामध्ये नेपियर गवत, ट्रॉपिकल शुगर बीट, आफ्रिकन मका लागवड करून बायोसीएनजी निर्मिती तसेच राष्ट्रीय महामार्गावर एमएसईबी मुक्त ईव्ही चार्जिंग स्टेशनची उभारणीचे नियोजन कंपनीने केले आहे.

या प्रकल्पामुळे रोजगार निर्मिती, शेतकऱ्यांना आर्थिक सक्षमता मिळणार आहे. याचबरोबरीने सेंद्रिय खतांची उपलब्धता झाल्याने जमिनीचा पोत सुधारण्यासाठी मदत होईल. अशा प्रकल्पांच्या उभारणीमुळे मोठ्या प्रमाणात इंधन आणि रासायनिक खतांची आयात कमी होईल. ग्रामीण भाग ऊर्जेमध्ये स्वयंपूर्ण होण्यास मदत होणार आहे.

नावीन्यपूर्ण संशोधन, विस्ताराला चालना :

पूर्वी ग्रामीण भागात बायोगॅस उभारण्यासाठी कुशल गवंडी मिळायचे, आता उपलब्धता कमी झाली आहे. हे लक्षात घेऊन पाटील यांनी सिंटेक्स कंपनीसोबत ‘तयार बायोगॅस प्रकल्प’ संकल्पना राबवली. आता चाळीस मिनिटांत ‘बायोगॅस प्रकल्प’ उभा करू शकतो. किर्लोस्कर कंपनीसोबत संशोधन सहकार्य करून शंभर टक्के बायोगॅसवर चालणाऱ्या जनरेटरची चार मॉडेल विकसित करण्यात आली आहेत.

चार ते पाच रुपये नाममात्र दराने ठिबक सिंचनातून विद्राव्य सेंद्रिय खत देण्यासाठी इटालियन कंपनीसोबत संशोधन करून विकसित केलेली यंत्रणा भारतामध्ये आयात करण्यात आली आहे. कंपनीच्या माध्यमातून अनेक गावांमध्ये चार ते पाच किलोमीटर पाइपलाइन करून नागरिकांच्या स्वयंपाकघरापर्यंत बायोगॅसचा पुरवठा प्रकल्प कंपनीने राबविला आहे. अशा पद्धतीने नावीन्यपूर्ण संशोधन करून नवतंत्रज्ञान विकसित करण्यात येत आहे. एखाद्या गोष्टीचे पेटंट घेऊन त्याचे स्वामित्व हक्क राखून ठेवायचे, हे गजानन पाटील यांना पटत नाही. गेली सतरा वर्षे नावीन्यपूर्ण संशोधन, नवनवीन गोष्टींचा ध्यास जोपासत असल्याने ‘ऊर्जा बायो सिस्टिम प्रा. लि.’ कंपनीचे अस्तित्व राष्ट्रीय पातळीवर पहिल्या तीनमध्ये पोहोचले आहे.

पुरस्कारांनी गौरव :

गजानन पाटील यांचा दोन आंतरराष्ट्रीय आणि सहा राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरव झाला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर युनायटेड नेशन इंडस्ट्रिअल डेव्हपमेंट ऑर्गनायझेशनचा पुरस्कार तसेच राष्ट्रीय पातळीवर भारत सरकारचे अपारंपरिक ऊर्जा मंत्रालय आणि इकॉनॅामिक टाइम्स ऑफ इंडियाचा पुरस्कार महत्त्वाचा आहे. राज्यपातळीवर ‘सकाळ माध्यम समूह’ आणि मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सतर्फे गजानन पाटील यांना गौरविण्यात आले आहे.

संपर्क : गजानन पाटील, ७०२८१८१३४३/ ७७७४०४३०४०
(ऊर्जा बायो सिस्टिम प्रा. लि, शिवाजीनगर, पुणे-४११०१६)
ई-मेल : projects@urjabiosystems.com

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com