Water Crisis Agrowon
ॲग्रो विशेष

Water Shortage : छत्रपती संभाजीनगरमधील २३८ गावे, ४५ वाड्यांची तहान टॅंकरवर

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : जिल्ह्यात सध्या २३८ गावे, ४५ वाड्यांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. १६८ गावांमध्ये १९१ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. वाढत्या उन्हाबरोबरच जिल्ह्यात टंचाईच्या झळा ही तीव्र होत आहेत.

जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पात २२.५४ टक्के जलसाठा आहे. मध्यम प्रकल्प १६ आहेत त्यात ९.१० टक्के जलसाठा आहे, तर लहान प्रकल्प ९७ आहेत त्यात १३.६५ टक्के जलसाठा आहे. असे एकूण ११४ प्रकल्पांमध्ये २०.७९ टक्के जलसाठा आहे.जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा एकीकडे लोकसभा निवडणुकीचे कामकाज सुरू असताना जिल्ह्यात निर्माण होत असलेली टंचाईची परिस्थिती हाताळून राबवावयाच्या उपाययोजना या संवेदनशीलतेने राबवाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी यंत्रणेस दिले.

जिल्ह्यातील टंचाई स्थिती, त्यावरील उपाययोजना याबाबत जिल्हाधिकारी स्वामी यांनी तालुकानिहाय आढावा दूरदृश्‍य प्रणालीद्वारे घेतला. जिल्हा मुख्यालयात अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, उपजिल्हाधिकारी अर्चना खेतमाळीस, नीलेश घोडके, तहसीलदार पल्लवी लिगाडे तसेच सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आदी सहभागी झाले होते. टंचाई स्थितीबाबत माहिती देण्यात आली.

टंचाई निवारण कामांसाठी आचारसंहितेचा अडथळा नाही...

जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारण कामांसाठी आचारसंहितेचा अडथळा नाही. त्याबद्दल निवडणूक आयोगाचे स्पष्ट निर्देश आहेत. टॅंकरचे प्रस्ताव संवेदनशीलतेने मंजूर करावे. रोजगार हमी योजनेची कामे सुरू ठेवावी. जास्तीत जास्त मजुरांना कामांवर सामावून घ्यावे.

या कालावधीत पाणी स्रोतांचे बळकटीकरण करण्याची कामे घेण्यात यावी. लोकांना पाणी बचतीचे महत्त्व सांगावे. पाणीस्रोतांचे बाष्पीभवन प्रतिबंधक उपाययोजना राबवाव्यात. पुनर्भरणासारखे उपक्रम राबवावे. निवडणूक कालावधी असला तरी टंचाई निवारण उपाययोजनांकडे लक्ष द्यावे व ग्रामस्थांना दिलासा द्यावा, असे निर्देश आढावा बैठकीत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT