Micro Irrigation Agrowon
ॲग्रो विशेष

Micro Irrigation Subsidy : ‘सूक्ष्म सिंचन’चे २१० कोटी अनुदान थकित

Agriculture Irrigation Scheme : शेतकऱ्यांना सिंचन सुविधा मिळून उत्पादनात वाढ साध्य करण्यासाठी सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत ठिबक, तुषार यासंबंधी अनुदान दिले जाते.

Team Agrowon

Jalgaon News : शेतकऱ्यांना सिंचन सुविधा मिळून उत्पादनात वाढ साध्य करण्यासाठी सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत ठिबक, तुषार यासंबंधी अनुदान दिले जाते. या योजनेत खानदेशातील सुमारे ३३ हजार शेतकरी सहभागी झाले. परंतु अनुदान प्राप्त झालेले नाही. सुमारे २१० कोटी रुपये सूक्ष्म सिंचन अनुदान थकित आहे.

जळगाव जिल्ह्यात २०२३-२४ मध्ये सुमारे २२ हजार व धुळे - नंदुरबारातील सुमारे ११ हजार शेतकरी सूक्ष्मसिंचन अनुदान योजनेत सहभागी झाले होते. यातील कमाल शेतकऱ्यांनी शेतात शासनाकडून निर्देशित कंपनीचे ठिबक संच बसविले आहेत.

योजनेत सहभागासाठी प्रथम कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागली. त्यासाठी ५०० रुपये निधी लागला. वणवण फिरावे लागले. यानंतर ‘महाडीबीटी’अंतर्गत पोर्टलवर अर्ज सादर केला. हा अर्ज मंजूर होऊन लॉटरीत समावेश झाला. पुढे पूर्वसंमती मिळाली. ही प्रकिया ऑनलाइन पार पडली.

सुमारे दोन ते चार महिने या प्रक्रियेला लागले. पूर्वसंमतीनंतर ठिबक खरेदीची सर्व बिले सादर करण्यात आली. कृषी विभागातील प्राधिकृत कर्मचाऱ्यांनी शेतात ठिबक संच आहे का, याबाबत पाहणी, पडताळणी केली. यानंतर अनुदानाचा प्रस्ताव अंतिम झाला. या प्रक्रियेत अनेकांना चार ते सहा महिने प्रतीक्षा करावी लागली. अनुदानाचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. परंतु निधी नाही. निधी नसल्याने शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे.

शेतकऱ्यांची गुंतवणूक मोठी

शेतकऱ्यांना आयएसआय प्रमाणित ठिबकची खरेदी या योजनेतून करावी लागते. यात एक हेक्टरसाठी किमान एक लाख ते एक लाख १० हजार रुपये खर्च येतो. हा पूर्ण खर्च प्रथम शेतकऱ्यास करावा लागतो. शेतात पिकाला ठिबकची व्यवस्था करावी लागते. त्याची बिले सादर करून पुढे लॉटरी, संमती, पाहणी अशी किचकट प्रक्रिया पार पडल्यानंतर शेतकऱ्यांना अनुदान मिळते.

कमाल शेतकरी केळी, भाजीपाला पिकांसाठी सूक्ष्म सिंचन अनुदान घेतात. केळी पीक सुमारे ११ ते १२ महिन्यांचे आहे. पिकातून किती नफा, निधी मिळेल, याचा अंदाज नसतानाही शेतकरी मोठी गुंतवणूक ठिबकसाठी करीत आहेत. शेतकऱ्यांना या योजनेतून तत्काळ मदत मिळावी, प्रस्ताव सादर झाल्यानंतर २१ ते २५ दिवसांत अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा व्हावे, त्यासंबंधी कालमर्यादा निश्‍चित करावी, असा मुद्दाही उपस्थित केला जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Procurement: कापूस खरेदी नोंदणी जलद व पारदर्शक करण्यासाठी ‘ॲग्रीस्टॅक पोर्टल’चा वापर करावा: पणन मंत्री जयकुमार रावल

Dust Pollution: धुळीमुळे श्वसनाच्या आजारात वाढ

Maharashtra Flood Damage: बांध-बंधारे फुटले, रस्त्यांची वाताहत

Women Farmers: साधने, अवजारांनी केले महिलांचे कष्ट हलके

Flood Relief: ‘आनंदाच्या शिधा’चा सरकारला पडला विसर?

SCROLL FOR NEXT