ॲग्रोवन वृत्तसेवा
Nashik Grampanchyat Election : नाशिक : राज्यातील एक हजार ६७३ ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणूक घेण्यासाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. निवडणूक आयोगाने मतदार यादी कार्यक्रम घोषित केला. जिल्ह्यातील २०२ ग्रामपंचायतींचा त्यात समावेश आहे. १९ तारखेला प्रारूप, तर २६ मार्चला अंतिम मतदार याद्यांची प्रसिद्धी करण्यात येईल. एप्रिलअखेर या सर्व ग्रामपंचायतींमध्ये मतदान होईल, असा अंदाज आहे.
राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींमधील मतदार यादी कार्यक्रम घोषित केला. त्यात जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत मुदत संपुष्टात येणाऱ्या, नव्याने अस्तित्वात आलेल्या तसेच चुकीची प्रभागरचना व बहिष्कारामुळे निवडणूक न झालेल्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या सर्व गावांमध्ये मतदार याद्या अंतिम करण्यात येतील. नोव्हेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या मतदार याद्यांची मदत घेण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत.
जिल्ह्यातील १३ तालुक्यांतील एकूण २०२ ग्रामपंचायतींमध्ये आता मतदार याद्या अंतिम केल्या जाणार आहेत. त्यात इगतपुरी तालुक्यातील सर्वाधिक ६५ ग्रामपंचायती आहेत. निफाड आणि बागलाणमधील अनुक्रमे ३२ व ३० ग्रामपंचायतींचा त्यात समावेश आहे. आयोगाकडून एकूणच तयारी पाहता एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकांची घोषणा, तर शेवटच्या आठवड्यात मतदान होऊ शकते. त्यामुळे इच्छुक कामाला लागले आहेत.
निवडणूक टप्पा:
१९ मार्च प्रारूप यादी प्रसिद्धी
२४ मार्च हरकती व सूचना कालावधी
२६ मार्च अंतिम मतदार यादी प्रसिद्धी
जिल्ह्यातील ग्रामपंचायती
तालुका ग्रामपंचायत संख्या
इगतपुरी ६५
निफाड ३२
बागलाण ३०
त्र्यंबकेश्वर १८
कळवण १४
मालेगाव १२
नांदगाव ८
येवला ८
नाशिक ७
दिंडोरी ४
देवळा २
पेठ १
चांदवड १
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.