Silk Production  Agrowon
ॲग्रो विशेष

Silk Production : परभणी, हिंगोली जिल्ह्यांत २०० टन रेशीम कोष उत्पादन

गतवर्षीच्या तुलनेत कोष उत्पादनात ४९ टनांनी वाढ

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
परभणी ः परभणी-हिंगोली जिल्ह्यात २०२२-२३ या आर्थिक वर्षात २०० टन रेशीम कोष उत्पादन (Silk Production) घेतले आहे.

त्यात परभणी जिल्ह्यातील १४७ टन आणि हिंगोली जिल्ह्यातील ५३ टन रेशीम कोषाचा समावेश आहे. गतवर्षीच्या (२०२१-२२) तुलनेत या दोन जिल्ह्यातील रेशीम कोष उत्पादनात ४९ टनांनी वाढ झाली आहे.

परभणी जिल्ह्यात एकूण ५०५ एकरवर तुती लागवड आहे. गतवर्षभरात शेतकऱ्यांना २ लाख १६ हजार ५०० अंडिपुंजांचा पुरवठा करण्यात आला.

त्यापासून १४७ टन रेशीम कोष उत्पादन मिळाले. गतवर्षीच्या तुलनेत तुती लागवडीखालील क्षेत्र कमी झाले आहे. २०२१-२२ मध्ये शेतकऱ्यांनी १ लाख ९१ हजार ३०० अंडीपुंजांपासून १२१ टन कोष उत्पादन घेतले होते.

त्यातुलनेत रेशीम कोष उत्पादनात २६ टनांची वाढ झाली, अशी माहिती जिल्हा रेशीम विकास अधिकारी गोविंद कदम यांनी दिली.

हिंगोली जिल्ह्यात जुनी तुती लागवडीमध्ये १७८ शेतकऱ्यांकडे १८४ एकर आणि नवीन तुती लागवडीमध्ये १३० शेतकऱ्यांकडे १३० एकर अशी जुनी नवी मिळून ३०८ शेतकऱ्यांकडे ३१४ एकर तुती लागवड आहे.

जुन्या शेतकऱ्यांनी ८४ हजार ४५० अंडीपुजांपासून ४६ टन आणि नवीन शेतकऱ्यांनी १९ हजार ७५० अंडीपुंजांपासून ७ टन असे एकूण १ लाख ४ हजार २०० अंडीपुंजांपासून ५३ टन कोष उत्पादन घेण्यात आले.

२०२१-२२ शेतकऱ्यांनी ६३ हजार ९०० अंडीपुंजांपासून ३० टन उत्पादन घेतले. त्या तुलनेत २०२२-२३ मध्ये कोष उत्पादनात २३ टनांनी वाढ झाली, अशी माहिती जिल्हा रेशीम विकास अधिकारी पी. एस. देशपांडे यांनी दिली.

२०२१-२२ या आर्थिक वर्षामध्ये परभणी जिल्ह्यातील १२१ टन आणि हिंगोली जिल्ह्यात ३० टन रेशीम कोष मिळून एकूण १५१ टन रेशीम कोष उत्पादन घेतले होते.

२०२०-२१ मध्ये परभणी जिल्ह्यात १२६.८० टन आणि हिंगोली जिल्ह्यात ४४.४१ टन असे एकूण १७१.२१ टन रेशीम कोष उत्पादन झाले होते. २०१९-२० मध्ये परभणी जिल्ह्यात १६७.५० टन आणि हिंगोली जिल्ह्यात ७५ टन रेशीम कोष उत्पादन घेण्यात आले होते.

रेशीम शेतीच्या माध्यमातून उत्पन्नाची शाश्‍वती आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गत रेशीम शेतीसाठी अनुदान दिले जाते. त्यामुळे या दोन जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा कल रेशीम शेतीकडे वाढत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Empowerment: परभणीतील ग्रामीण भागात ३४ हजार एकल महिला

Vice President Election 2025 : सी. पी. राधाकृष्णन देशाचे १५ वे नवे उपराष्ट्रपती, इंडिया आघाडीची मते फुटली

Hivare Bazar Village: हिवरे बाजारला ‘जल समृद्ध गाव’ पुरस्कार

Cotton Cultivation: पुणे जिल्ह्यात कापूस लागवडीत होतेय वाढ

Organic Fertilizer Production: कणकवलीत सहा टन निर्माल्यापासून खत निर्मिती

SCROLL FOR NEXT