Maharashtra Sugarcane Season agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Season : ऊसतोड मुकादमास २० लाखांचा दंड

Sugarcane Harvesting Contractor : समशेरपूर येथील ॲस्टोरिया अॅग्रो अॅण्ड अलाइड इंडस्ट्रीज प्रा.लि. साखर कारखान्यात २०१३-१४ या हंगामात ऊसतोड मुकादम फुलसिंग अर्जुन कुवर (रा. आमळी ता. साक्री, जि. धुळे) यांनी ऊस तोडणी कामासाठी लेखी करार केला होता.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Nandurbar News : समशेरपूर (ता. नंदुरबार) येथील तत्कालीन ॲस्टोरिया अॅग्रो अॅण्ड अलाइड इंडस्ट्रीज प्रा. लि. या साखर कारखान्यास खोटा धनादेश दिल्याप्रकरणी ऊसतोड मुकादमास २० लाख ४८ हजार ९२४ रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री. संदिप बी. मोरे यांनी दिले आहेत.

समशेरपूर येथील ॲस्टोरिया अॅग्रो अॅण्ड अलाइड इंडस्ट्रीज प्रा.लि. साखर कारखान्यात २०१३-१४ या हंगामात ऊसतोड मुकादम फुलसिंग अर्जुन कुवर (रा. आमळी ता. साक्री, जि. धुळे) यांनी ऊस तोडणी कामासाठी लेखी करार केला होता.

करारापोटी कुवर यास ११ लाख २४ हजार ६६२ रुपये उचल देण्यात आली होती. मात्र कराराप्रमाणे काम न केल्याने कुवर यांच्याकडे ११ लाख २४ हजार ६६२ रुपये ॲस्टोरिया अॅग्रो अॅण्ड अलाइड इंडस्ट्रीज प्रा. लि. साखर कारखान्याचे घेणे बाकी आहे.

थकित रक्कम कुवर यांच्याकडे मागणी केली असता, त्याने कारखान्याला धनादेश दिला होता, परंतु तो वटला नाही. कारखान्याने कुवर यांच्याविरुद्ध नंदुरबार न्यायालयात गुन्हा दाखल केला.

प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर या प्रकारणाची सुनावणी झाली. कुवर यांस वीस लाख अठ्ठेचाळीस हजार नऊशे चोवीस रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Sowing : मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत २२ टक्के कपाशी क्षेत्र घटले

Cotton Disease : कपाशीवर वाढतोय टोबॅको स्ट्रीक विषाणूंचा प्रादुर्भाव

Wire Fencing Scheme: शेताला तार कुंपनासाठी मिळणार ९० टक्क्यांपर्यंत अनुदान

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटलांचा शिवनेरीवर संकल्प; आरक्षण मिळेपर्यंत लढा सुरूच

Ganesh Festival Konkan : माटीच्या फळाफुलांची कोट्यवधींची उलाढाल

SCROLL FOR NEXT