Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Dam Water Reservoir : राज्यातील २० धरणे भरली

Team Agrowon

Pune News : गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. घाटमाथा, मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भाग आणि कोकणात संततधार पाऊस पडत आहे. शनिवारी (ता.३) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत दावडी घाटमाथ्यांवर १९६ मिलिमीटर पाऊस झाला. राज्यातील २० धरणे शंभर टक्के भरली असून, १० ते १२ धरणांत ७० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाला आहे. भरलेल्या धरणांतून विसर्ग सोडण्यात आला असून तो कमीअधिक करण्यात येत आहे.

कोकणातील रायगडमधील बिरवडी मंडलात सर्वाधिक १४८, रत्नागिरीतील शिर्शी, दाभीळ ७९, सिंधुदुर्गमधील म्हापण ५१, कणकवली, सांगवे ५९, वागदे ५४, कुडाळ ५५, वालावल, तर वैभववाडी येथे ५१ मिलिमीटर पाऊस पडला. घाटमाथ्यांवर जोरदार पाऊस कोसळत आहे.

कोकणातील धरणक्षेत्रांत हलका ते मध्यम पाऊस झाला असून धामणी, तिल्लारी, बारवी, मोडकसागर यासह सर्वच धरणे भरली आहेत. त्यामुळे कुंडलिका, अंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास, गाढी, जगबुडी, वशिष्टी या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. तर जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे.

खानदेशातील नंदूरबारमधील मोलगी, वडफळी मंडलात ६५ मिलिमीटर पाऊस झाला. धुळे, जळगाव जिल्ह्यांत शिडकावा झाला. पुणे जिल्ह्यातील वेल्हा १४८, कार्ला १२७, पानशेत १०७, माले, मुठे ८१, भोलावडे ८२, नसरापूर ७८, लोणावळा ९७, विंझर ७४, आंबवणे ७८, साताऱ्यातील केळघर ६४, महाबळेश्‍वर ९५, तापोळा ७३, लामज येथे ६२ मिलिमीटर पाऊस झाला. त्यामुळे कृष्णा, भीमा खोऱ्यातील अनेक नद्या दुथडी भरून वाहत असून अनेक धरणे भरत आली आहेत. नगर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत हलका पाऊस झाला.

चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत जोरदार

विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. यामध्ये चंद्रपूरमधील बेंबळ, सावळी, पाथरी, विहाड ५८, मूल, चिखली ३४, नांदोरी, नावरगाव, वरोरा ३२, खांबडा ४८, मांगळी ४७, भद्रावती, शिंदेवाही ४०, गडचिरोलीतील तरडगाव ८४, गडचिरोली ७१, पोरळा ३९, येवळी, भामरागड ६९, ब्राह्मणी चाटेगाव ५९, पिसेवढथा ३६, चामोर्शी ५१, कुंघाडा ५३, अहेरी ५५, पेरमिली ६२, भेंडाळा, जरावंडी, धानोरा ५८, तर पेंढरी येथे ६७ मिलिमीटर पाऊस पडला. विदर्भातील नद्या भरून वाहत असून धरणांतील पाणीपातळी वेगाने वाढत आहे. मराठवाड्यात ढगाळ वातावरण असून तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nana Patekar : स्वामिनाथन आयोग लागू करा

Pomegranate Production : डाळिंब उत्पादनामध्ये २० टक्के घट शक्य

Retreating Monsoon : परतीचा पाऊस धुमाकूळ घालण्याची शक्यता

Maharashtra Rain : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात पावसाची शक्यता

Crop Damage : स्थानिक नैसर्गिक आपत्तीअंतर्गत ४ लाख ५४ हजारांवर पूर्वसूचना

SCROLL FOR NEXT