Agricultural College of Latur agrowon
ॲग्रो विशेष

Agricultural College of Latur : लातूरच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचा होणार कायापालट, २ कोटींचा निधी देणार

Agriculture Department : कृषी विभागाने गल्ले बोरगाव, ता.खुलताबाद जि. छत्रपती संभाजीनगर येथे अद्रक संशोधन केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला.

sandeep Shirguppe

Dhananjay Munde : लातूर येथील विलासराव देशमुख कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी तत्काळ २ कोटी रुपयांचा निधी देण्याचा तसेच संपूर्ण नूतनीकरणासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्याचे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत विलासराव देशमुख कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय लातूर येथील अडचणी दूर करण्याबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. आमदार सतीश चव्हाण यांच्या मागणीवरून या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीस आमदार सतीश चव्हाण, आमदार रमेश कराड, महाराष्ट्र कृषी शिक्षण परिषदेचे संचालक हेमंत पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे, डॉ.जहागीरदार, गोविंदराव देशमुख तसेच मंत्रालयातील विविध अधिकारी उपस्थित होते.

छत्रपती संभाजीनगर कृषी महाविद्यालयाचा प्रस्ताव सादर करावा

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकही शासकीय कृषी पदवी किंवा पदव्युत्तर पदवी महाविद्यालय नसल्याने नवीन महिला कृषी महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या महाविद्यालयाच्या स्थापनेसाठी निधी मागणीचा प्रस्ताव वित्त विभागास सादर करण्याचे निर्देश यावेळी मंत्री श्री. मुंडे यांनी दिले.

अद्रक संशोधन केंद्रास पळसवाडी येथील जमीन

कृषी विभागाने गल्ले बोरगाव, ता.खुलताबाद जि. छत्रपती संभाजीनगर येथे अद्रक संशोधन केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी उपलब्ध असणारी विद्यापीठाची जमीन अपुरी असल्यामुळे पळसवाडी येथील जमीन या प्रकल्पासाठी मागणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी विद्यापीठाने छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीने जमीन मागणीचा प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश मंत्री श्री. मुंडे यांनी दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT