Satara District Development Plan  Agrowon
ॲग्रो विशेष

District Development Plan : साताऱ्यात १९० कोटींच्या कामांना मान्यता : देसाई

Team Agrowon

Satara News : जिल्हा नियोजन समितीच्या मंगळवारी (ता. १६) झालेल्या बैठकीत १९० कोटींच्या विविध विकासकामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे, असे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलिस अधीक्षक समीर शेख, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, महेश शिंदे या वेळी उपस्थित होते.

देसाई म्हणाले, ‘‘जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मॉडेल स्कूल स्मार्ट ‘पीएचसीं’चा सातारा पॅटर्न राज्यात राबविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. जिल्हा नियोजन समितीतून १५० कोटींची तरतूद केली असून, यामध्ये २२५ शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे स्मार्ट करणार आहोत. यातील काही शाळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दाखवून त्यांच्या हस्ते १५ ऑगस्टपूर्वी लोकार्पण होईल.’’

‘‘नियोजन समितीचा ५७५ कोटींचा आराखडा आहे. मार्चपासून जुलैपर्यंतच्या १९० कोटींच्या कामांना मान्यता आजच्या बैठकीत देण्यात आल्या. इतक्या मोठ्या प्रमाणात प्रशासकीय मान्यता देणारा सातारा जिल्हा महाराष्ट्रात पहिला आहे. या वेळेस स्मार्ट स्कूल आणि स्मार्ट ‘पीएचसी’साठी नियोजनमधून १५० कोटींची तरतूद केली आहे. यातून २२५ शाळा आणि सगळी आरोग्य केंद्रे स्मार्ट करणार आहोत. याचे लोकार्पण १५ ऑगस्टपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केले जाईल,’’ असे देसाई म्हणाले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, तीन गॅस सिलिंडर मोफत देणे व शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याच्या निर्णयाचा आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी अभिनंदनाचा ठराव मांडला होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Udgir APMC : शेतकरी म्हणून निवडून आलेले सभापती हुडेंसह पाच जण अपात्र

Irrigation Scheme : बेलकुंड उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणाला मंजुरी

Crop Damage Survey : पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे पूर्ण

Grape Pruning : सांगली जिल्ह्यात द्राक्षफळ छाटणीची तयारी सुरू

E-Peek Pahani : ई-पीक पाहणीबाबत महत्वाची अपडेट; ई-पीक पाहणीसाठी आठ दिवसांची मुदतवाढ

SCROLL FOR NEXT