Ujani Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Ujani Water Stock : उजनीत दीड महिन्यात वाढले १९ टीएमसी पाणी

Ujani Water Level : गेल्या काही दिवसात झालेल्या चांगल्या पावसामुळे जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणामध्ये पाण्याचा विसर्ग अखंडपणे सुरू आहे.

सुदर्शन सुतार

Solapur News : गेल्या काही दिवसात झालेल्या चांगल्या पावसामुळे जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणामध्ये पाण्याचा विसर्ग अखंडपणे सुरू आहे. उणेपातळीत गेलेले धरण अधिक पातळीकडे वेगाने सरकत आले आहे. गेल्या दीड महिन्यात सुमारे १९ टीएमसी पाणी उजनी धरणात साठले आहे.

उजनी धरणात ११७ टीएमसी पाणी साठते, पण त्यातील ८४ टीएमसी पाण्याचेच दरवर्षी वापरासाठी नियोजन होते. पण यंदा उजनी धरण उणे ६० टक्क्यांपर्यंत पोचल्याने सोलापूर शहरासाठी दुबार, तिबार पंपिंग करावे लागले. केवळ पिण्यासाठी पाणी राखीव ठेवल्याने शेतीसाठी पाणी बंद करण्यात आले.

उजनी धरण मेमध्ये उणे पातळीत गेले आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात ते आणखी उणे पातळीत चालले. पण त्यादरम्यान सोलापूरसह पुणे जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने धरणाच्या वरच्या बाजूकडील धरणातून अतिरिक्त पाणी उजनीकडे सोडण्यात आले. त्यामुळे उणे ६० टक्क्यांची पातळी आता उणे २६ टक्क्यांवर आली आहे. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.

सध्या पाऊस थांबला आहे. पण धरणाकडे येणाऱ्या पाण्याचा विसर्ग ५ हजार ३१८ क्युसेक इतका आहे. त्यामुळे लवकरच धरण उणेतून अधिकमध्ये येईल, अशी स्थिती आहे. पण या दीड महिन्याच्या कालावधीत सुमारे १९ टीएमसी इतके पाणी वाढले आहे.

उणे २६ टक्के पाणी

उजनी धरणात गुरुवारी (ता. १८) धरणाची एकूण पाणी पातळी ४८८.८३० मीटर इतकी होती. तर एकूण पाणीसाठा ४९.८१ टीएमसी आणि त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा उणे १३.८५ टीएमसी एवढा राहिला. तर या पाण्याची टक्केवारी उणे २५.८६ टक्के इतकी आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT