Chief Minister Mazi Ladki Bahin Yojana Agrowon
ॲग्रो विशेष

CM Ladki Bahin Yojana : पुणे जिल्ह्यातील १९ लाख अर्ज ‘लाडकी बहीण’साठी पात्र

Team Agrowon

Pune News : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पुणे जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील १९ लाख ६२ हजार ६६७ लाभार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यातील १९ लाख १४ हजार ५७९ लाभार्थी पात्र झाल्याचे माहिती सूत्रांनी दिली.

आंबेगाव, बारामती, भोर, दौंड, हवेली, इंदापूर, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी, पुरंदर, शिरूर, वेल्हा व पुणे शहर या तालुक्यांतून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज आले होते. त्यापैकी पाच हजार अठरा अर्ज विविध कारणांमुळे बाद झाले. तर १३ हजार ३२९ अर्ज कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी प्रलंबित आहेत. मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या योजनेबाबत माहिती विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी जिल्ह्यात फिरून प्रत्यक्ष लाभार्थ्यांची संपर्क साधून या योजनेचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत मिळतो की नाही याची माहिती त्यांनी घेतली.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र महिला लाभार्थ्यांना दीड हजार रुपयांची मदत देण्यात येत आहे. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगाने लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणीबाबत नारीशक्ती अॅप किंवा माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या संकेतस्थळावर लॉगिन करून त्रुटी असलेले अर्ज फेरसादर करावे, असे आवाहन करण्यात आले होते.

अर्ज मंजूर झाल्यानंतरही बॅंक खात्यात पैसे जमा न झालेल्या महिलांनी बँक खात्यासोबत आधारकार्ड संलग्न करून घ्यावे. नारीशक्ती अॅप किंवा माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या संकेतस्थळावर अर्ज भरलेल्या महिलांनी आपले आधारकार्ड बँक खात्याशी संलग्न असल्याची खात्री करावी. ही प्रकिया पूर्ण केल्यानंतरच योजनेचा लाभ मिळणार आहे.

तालुकानिहाय अर्जाची संख्या व कंसात पात्र संख्या

आंबेगाव ६२,७९५ (६१,७०२), बारामती १,१५,९७२ (१,१३,२६२), भोर ५०,५४५ (४९,६८४), दौंड ९६,३४३ (९४,२४६), हवेली ४,१०,६४२ (४,०३,५५०), इंदापूर १,०३,९७४ (१,०२,८३६), जुन्नर १,००,६२९ (९८,७१९), खेड १,१२,५९८ (१,१०,१७७), मावळ ९०,७३१ (८७,७०५), मुळशी ४४,६७५ (४३,६६०), पुरंदर ६४,६४४ (६३,७९९), शिरूर १,००,१७८ (९९,१३४), वेल्हा १४,१२६ (१३,५३३), पुणे शहर ५,९४,७८५ (५,२७,२७९).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Oilseed Production : 'राष्ट्रीय खाद्यतेल-तेलबिया अभियाना'ला केंद्रिय मंत्रिमंडळाची मंजूरी; तेलबिया उत्पादन वाढवण्याचं उद्दिष्ट निश्चित

Water Conservation : ‘जीआयएस’ प्रणाली कशी चालते?

Inter Cropping : पूर्वहंगामी उसामध्ये योग्य आंतरपिकांची निवड

Madgyal Sheep : माडग्याळ मेंढीपालकांचे गाव

Ova Crop Cultivation : कमी पाण्यात हमखास उत्पादन देणारं 'ओवा पीक'

SCROLL FOR NEXT