Sugarcane Burnt Kolhapur agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Burnt Kolhapur : १९ एकर ऊस जळून खाक; ४० लाखांचे नुकसान, कोल्हापुरातील घटना

Sugarcane News : कोल्हापूर जिल्ह्यातील दोन घटनांमध्ये १९ एकर ऊस जळाला यामध्ये सुमारे ४० लाखांचे नुकसान झाले.

sandeep Shirguppe

Kolhapur Sugarcane Rate : कोल्हापूर जिल्ह्यात ऊस तोडीच्या हंगामाला जोरदार सुरूवात झाली आहे. परंतु हातकणंगले तालुक्यात उभे ऊस पेटण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. पंचगंगा सहकारी साखर कारखान्याच्या लगत असलेल्या कबनूर बायपास रोडवर असलेल्या उसाला आग लागल्याने जवळपास १५ एकर पेक्षा जास्त ऊस जळाला आहे.

यामध्ये जयकुमार कोले यांचा १२ एकर, आप्पासो निंबाळकर यांचा ३ एकर व सुभाष कोले यांचा अर्धा एकर अशा एकूण साडेपंधरा एकरातील उसाला आग लागली. आगीत साडेपंधरा एकरातील संपूर्ण ऊस जळून खाक झाला.

आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. पंचगंगा साखर कारखान्याच्या अग्निशामकनेही आग विझवण्याचा प्रयत्न केला, पण साडेपंधरा एकर ऊस जळून खाक झाला. यामुळे सुमारे ३५ ते ३६ लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

आजरा तालुक्यातही अशीच घटना

धनगरमोळा (ता. आजरा) येथे लागलेल्या आगीत साडेतीन एकर क्षेत्रावरील ऊस जळून खाक झाला. अंकुश विठ्ठल पाटील या शेतकऱ्याचे सुमारे साडेतीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, धनगरमोळा व सुळेरान परिसरालगत नलवडे फार्म जवळ माजी सैनिक शेटगे यांचे शेत आहे. दुपारी साडे बाराच्या सुमाराला आग लागली. प्रसंगावधान साधून आग विझवल्यामुळे पुढील अनर्थ टळला. शार्ट सर्किट झाल्याने आग लागल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

या शेतातील साडेतीन एकर क्षेत्रावर त्यांनी ऊसाची लागवड केली होती. या शेता लगत विद्युतवाहिनी गेली आहे. उसाला आग लागल्याचे रस्त्यावरून जाणाऱ्या जयसिंग पाटील यांना दिसले. त्यांनी माऊली शाळेतील शिक्षक व विद्यार्थांना माहिती दिली. विद्यार्थी व शिक्षकांनी पाणी व झाडांचे डहाळे वापरून आग विझवली.

प्रसंगावधान राखून आग विझवल्यामुळे सुमारे दहा ते पंधरा एकरवरील ऊस वाचला. अंकुश पाटील हे विनाअनुदानित शाळेत शिक्षक म्हणून काम करीत आहेत. ऊस जळाल्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आजरा कारखान्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Procurement : बारामती बाजार समितीत सोयाबीन खरेदी सुरू

Maharashtra Election 2024 : पुणे जिल्ह्यात आचारसंहिता भंगाच्या १ हजार ५४ तक्रारींवर कार्यवाही

Paddy Harvesting : जुन्नरच्या आदिवासी भागात भातकापणी, झोडणीच्या कामांना वेग

Maharashtra Weather : राज्यात विजांसह पावसाचा इशारा कायम

Crop Damage Compensation : काहींना नुकसान भरपाईचे वाटप तर अनेकांना अजूनही प्रतीक्षाच

SCROLL FOR NEXT