Sugarcane Management : ऊस शेतीचे काटेकोर व्यवस्थापन करणे गरजेचे

Dr. Ashok Pisal : बदलत्या काळात ऊस शेती करणे आव्हानात्मक आहे. योग्य तंत्रज्ञानाचा वापर करूनच शेती करावी यासाठी ऊस शेतीचे काटेकोर व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. असे संशोधन संचालक डॉ. अशोक पिसाळ म्हटले.
डॉ. अशोक पिसाळ
डॉ. अशोक पिसाळAgrowon
Published on
Updated on

Kolhapur News : बदलत्या काळात ऊस शेती करणे आव्हानात्मक आहे. योग्य तंत्रज्ञानाचा वापर करूनच शेती करावी यासाठी ऊस शेतीचे काटेकोर व्यवस्थापन करणे गरजेचे असल्याचे मत येथील विभागीय कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. अशोक पिसाळ यांनी येथे केले.

सैनिक टाकळी (ता. शिरोळ) येथे ‘ॲग्रोवन’ व ‘रिवुलिस इरिगेशन इ. प्रा. लि.’ यांच्या संयुक्त विद्यमाने ऊसविषयक चर्चासत्र झाले. त्या वेळी डॉ. पिसाळ बोलत होते. डॉ. पिसाळ यांनी या वेळी बियाणे निवड ते ऊस तोडणीपर्यंतच्या बाबींची सविस्तर माहिती दिली. शेतकऱ्यांनी अधिकाधिक उत्पादन वाढीसाठी नावीन्यपूर्ण जातींचा वापर करावा, असेही त्यांनी सांगितले.

डॉ. अशोक पिसाळ
Sugarcane Management : आपत्कालीन परिस्थितीतील ऊस व्यवस्थापन

सरपंच हर्षदा पाटील अध्यक्षस्थानी होत्या. रिवुलिस इरिगेशन इ. प्रा. लि.चे विभागीय व्यवस्थापक सागर पिसे, गुरुदत्त शुगरचे ऊस विकास अधिकारी संग्राम घोरपडे, शिवराज माने आदी उपस्थित होते.

डॉ. अशोक पिसाळ
Sugarcane FRP : सोलापुरात ७३ कोटी रुपयांची एफआरपी थकित

रिवुलिस इरिगेशन इं. प्रा. लि.चे वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ नितीन जाधव म्हणाले, की आमच्या कंपनीने जगातील १२० पेक्षा अधिक देशांमध्ये काम केले आहे. इस्राईलस्थित असणाऱ्या कंपनीने उपग्रहाद्वारे पीकपाणी नियोजन विकसित केले आहे.

मान्ना एरिगेशन ॲपद्वारे शेतकऱ्यांना विविध सुविधा दिल्या आहेत. शेतकऱ्यांना पाणी बचतीसाठी योग्य ते मार्गदर्शन या ॲपद्वारे केले जाते. विशाल जाधव यांनी सूत्रसंचालन केले. राजकुमार चौगुले यांनी प्रास्ताविक केले. विनोद पाटील यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com