Solar Energy  Agrowon
ॲग्रो विशेष

Solar Energy : बुलडाणा जिल्ह्यात १८६० घरांवर होणार वीजनिर्मिती

Electricity : महावितरणच्या ‘रूफ टॉप सोलर’ योजनेचा लाभ घेत जिल्ह्यातील १ हजार ८६० घरावर सौर पॅनेलच्या माध्यमातून वीज निर्मिती केली जात आहे.

Team Agrowon

Buldana News : महावितरणच्या ‘रूफ टॉप सोलर’ योजनेचा लाभ घेत जिल्ह्यातील १ हजार ८६० घरावर सौर पॅनेलच्या माध्यमातून वीज निर्मिती केली जात आहे. राज्यात वीज ग्राहकांनी छतावर सौरऊर्जा निर्मिती पॅनेल बसवून वीजनिर्मिती करण्याच्या बाबतीत केंद्र सरकारने दिलेले १०० मेगावॉट वीजनिर्मितीचे उद्दिष्ट महावितरणने चार महिने आधी पूर्ण केले आहे.

महावितरण यापुढेही ही मोहीम चालू ठेवणार असल्याने जिल्ह्यातील वीज ग्राहकांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे. छतावरील सौरऊर्जानिर्मिती, अर्थात रूफ टॉप सोलरमुळे ग्राहक स्वतःच वीजनिर्मिती करून वापरतात.

त्यामुळे त्यांचे वीजबिल कमी होते. गरजेपेक्षा जास्त वीजनिर्मिती झाली तर त्यांना ती महावितरणला विकता येते. छतावरील सौरऊर्जा निर्मितीसाठी केंद्र शासनाकडून वीज ग्राहकांना ४० टक्क्यांपर्यंत अनुदान मिळते.

...असे आहे अनुदान

सर्वसाधारणपणे एखाद्या कुटुंबाला ३ किलोवॉटचा सौरऊर्जानिर्मिती प्रकल्प पुरेसा ठरतो. त्यासाठी सरकारकडून सुमारे ४३ हजार रुपये ते ५६ हजार रुपये अनुदान मिळते.

तीन किलोवॉट ते दहा किलोवॉट क्षमतेच्या प्रकल्पांना तीन किलोवॉटनंतर प्रत्येक किलोवॉटला सुमारे सात ते नऊ हजार रुपये अनुदान मिळते.

जिल्ह्यात १८६० घरावर होत आहे वीजनिर्मिती

जिल्ह्यातील १ हजार ८६० ग्राहकांनी महावितरणच्या रूफ टॉप योजनेचा लाभ घेत स्वतःच आपल्या छतावर वीज निर्मिती करीत आहेत. त्यामुळे त्यांचे वीजबिल शून्यापर्यंत कमी झाले आहे.

शिवाय तयार झालेली शिलकीची वीज महावितरणला विकण्यात येते. रूफ टॉप सोलर योजनेचा सर्वसामान्यांनीही लाभ घ्यावा यासाठी महावितरणकडून प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Alert: मराठवाडा, विदर्भात उघडीप राहणार; कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता

Rain Crop Damage : मालेगावात ४ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

Lihakhedi Agri College : ना पद मान्यता, ना निधीची उपलब्धता

Rain Crop Damage: आठ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; नांदेड-वाशीम जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान

Bhutwada Dam : जामखेडला पाणीपुरवठा करणारा भुतवडा तलाव भरल्याने तालुक्यात समाधान

SCROLL FOR NEXT