Water Crisis  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Stock : वारणा धरणात १८ टीएमसी पाणी

Water Crisis : मार्चच्या सुरुवातीपासून पिकांसाठी व पिण्याच्या पाण्याची मागणीत वाढली आहे.

Team Agrowon

Sangli News : जिल्ह्यातील पश्चिम भागात ३४.४० साठवण क्षमता असलेल्या वारणा धरणातील पाणीसाठा केवळ १८ टीएमसी शिल्लक आहे. तर त्यातील वापरण्यायोग्य पाणीसाठा १२ टीएमसी शिल्लक आहे. मार्चच्या सुरुवातीपासून पिकांसाठी व पिण्याच्या पाण्याची मागणीत वाढली आहे.

त्यामुळे वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. २० फेब्रुवारी धरणात २३ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. गेल्या ३६ दिवसांत ५ टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

वारणा धरणातून सरासरी ७ ते ८ दिवसांना १ टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. पुढील काळात उन्हाची तीव्रता वाढत जाईल, शेती, तसेच औद्योगिक व पिण्याच्या पाण्याची मागणी वाढत जाणार आहे.

जूनच्या पहिल्या आठवड्यानंतर पावसाला सुरुवात होते. म्हणजे अद्याप दोन ते सव्वा दोन महिने पाणी पुरवण्याचे नियोजन धरण प्रशासनाला करावे लागणार आहे. सध्या धरणाच्या वीजनिर्मिती केंद्रातून ९६५ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

वारणा डावा कालव्यातून ३५० क्युसेक तर वारणा नदीपात्रातून ७१५ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मात्र, यापुढील काळात उन्हाळ्यात पाण्याच्या मागणीत वाढली जाणार आहे. त्यामुळे पाण्याचे योग्य अंदाज घेऊन टंचाई भासणार नाही आणि धरणातील पाणी पातळी कमी होणार नाही, असे काटेकोर नियोजन धरण प्रशासनाने करण्याची मागणी होत आहे.

या वर्षी धरण प्रशासनाच्या नेटक्या नियोजनामुळे सिंचनासाठी व औद्योगिक कारणासाठी जूनअखेर पर्यंत पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध आहे.
- मिलिंद कितवाडकर, सहायक अभियंता

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vasantrao Naik: पहिले शेतकरी मुख्यमंत्री

Orchard Nutrient Management : फळपिकांसाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन महत्त्वाचे

Agriculture PhD Education: अधिछात्रवृत्तीअभावी कृषी संशोधन धोक्यात

Onion Storage Shed : कांदा चाळीने सोडविली साठवणुकीसह दरांची समस्या

Dragon Fruit Farming : ड्रॅगन फ्रूट ठरले आश्‍वासक

SCROLL FOR NEXT