Milk Subsidy agrowon
ॲग्रो विशेष

Milk Subsidy : दूध अनुदानाचे १८ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

Subsidy Deposited in Farmer Account : दूध उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने लिटरमागे पाच रुपयांचे अनुदान दिले होते. यामध्ये जिल्ह्यातील एक लाख आठ हजार २२३ शेतकऱ्यांच्या खात्यावर १८ कोटी दुधाचे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले आहे.

Team Agrowon

Satara News : दूध उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने लिटरमागे पाच रुपयांचे अनुदान दिले होते. यामध्ये जिल्ह्यातील एक लाख आठ हजार २२३ शेतकऱ्यांच्या खात्यावर १८ कोटी दुधाचे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले आहे. आतापर्यंत ७५ टक्के शेतकऱ्यांना अनुदान मिळाले असून, या अनुदानामुळे दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

दूध उत्पादक शेतकऱ्यांना काही प्रमाणात फायदा मिळण्यासाठी ११ जानेवारी ते १० मार्च या दोन महिन्यांच्या कालावधीत शासनाने पाच रुपये अनुदान देण्याची योजना सुरू केली होती. मात्र तांत्रिक कारणांनी अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यास अडथळे येत होते. जिल्ह्यातील काही शेतकरी शेजारील जिल्ह्यात दूध संघांना दूध पुरवठा करत आहेत.

अशा शेतकऱ्यांची माहिती संकलित करून त्यांनाही अनुदानाचा लाभ देला जात आहे. याचबरोबर एकही शेतकरी अनुदानापासून वंचित राहू नये यासाठी पशुसंवर्धन विभागाने मुदत वाढविली आहे. त्यामुळे या योजनेसाठी ऑनलाइन प्रक्रिया केलेल्या शेतकऱ्यांना दूध अनुदानाचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यातील २४ संकलन करणाऱ्या संस्थांतील शेतकऱ्यांना हा अनुदानाचा लाभ मिळाला आहे. यामध्ये सर्वाधिक गोविंद मिल्क ॲण्ड मिल्क संस्थेचे शेतकरी आहेत.

दूध दरात घट झाल्‍याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यातच दुष्काळी परिस्थितीमुळे पाणीटंचाई, चाराटंचाई असल्याने शेतकऱ्यांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. या काळात शेतकऱ्यांना अनुदान मिळाल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी प्रकाश आवटे यांच्या मार्गदर्शनाखाली व संजय पवार, सर्जेराव धुरगुडे व अतुल रासकर यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा सहभागी व्हावा यासाठी परिश्रम घेतले.

दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी पाच रुपये अनुदानाची योजना सुरू केली होती. जिल्ह्यातील २४ संकलन संस्थांकडील आतापर्यंत ७५ टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा केले आहे.
प्रकाश आवटे, जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी, सातारा

जिल्ह्यातील आकडेवारी

एकूण लाभ मिळालेले शेतकरी

१,०८,२२३

एकूण जनावरे

३,८२,८३४

अनुदान मिळालेले दूध

३,६९,९१,३८०

मिळालेले अनुदान (रुपये)

१८,००,११,२७५

दुग्ध संकलन संस्था

२४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT