Electricity Connection Agrowon
ॲग्रो विशेष

Electricity Connection : वऱ्हाडातील १७८ कृषी फीडरचे होणार ‘सेपरेशन’

MSCB DP : : महावितरणच्या अकोला परिमंडळात आर. डी. एस. योजनेत कृषी आणि गावठाण फीडर विलगीकरण करण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत १३ फीडरचे काम प्रगतिपथावर आहे. जुलै २०२५ पर्यंत परिमंडळातील १७८ फीडरच्या विलगीकरणाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

Team Agrowon

Akola News : महावितरणच्या अकोला परिमंडळात आर. डी. एस. योजनेत कृषी आणि गावठाण फीडर विलगीकरण करण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत १३ फीडरचे काम प्रगतिपथावर आहे. जुलै २०२५ पर्यंत परिमंडळातील १७८ फीडरच्या विलगीकरणाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा करणे शक्य होणार आहे.

महावितरणच्या आर.डी.एस.एस. आणि आर. पी. एम. योजनेअंतर्गत परिमंडळात वीज यंत्रणा विस्तारीकरण आणि सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेली कामे ही दिलेल्या माइलस्टोननुसारच पूर्ण करण्यात यावेत. शिवाय महावितरणने निश्‍चित केलेल्या साहित्याच्या आणि कामाच्या गुणवत्तेतनुसारच काम करण्याचे निर्देश संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे यांनी दिले. विद्युत भवन अकोला येथे कंत्राटदारांच्या बैठकीत त्यांनी परिमंडळात सुरू असलेल्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. या वेळी अधीक्षक अभियंता (पा.आ.) अनिल वाकोडे, कार्यकारी अभियंता ज्ञानेश पानपाटील, जयंत पैकीने, विजयकुमार कासट, अनिल उईके, कंत्राटदार एजन्सीजचे प्रतिनिधी आणि पायाभूत आराखडा विभागाच्या यामिनी पिंपळे, निखिल खोर, अमोल लखडे, अविनाश पाटील, शैलेश देशमुख उपस्थित होते.

..तर दिवस वीजपुरवठा शक्य

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत कृषी फीडरच्या माध्यमातून शेतीसाठी शाश्‍वत आणि दिवसा वीज देण्याचे नियोजन आहे. अकोला परिमंडलात आर. डी. एस. योजनेत १७८ कृषी फीडर तयार करण्यात येणार आहे. २६२ कोटी रुपये या योजनेत खर्च होणार आहे. यामध्ये अकोला जिल्हा ९६, बुलडाणा ६३ आणि वाशीम जिल्ह्यातील १९ फीडरचा समावेश आहे. दाब नियंत्रणासाठी कपॅसिटर बँक शेतीसाठी वीजपुरवठा करताना व्होल्टेज कमी जास्त होऊ नये यासाठी परिमंडळात ९९ ठिकाणी महावितरणच्या उपकेंद्रात कपॅसिटर बँक बसविण्याची कामे सुरू आहेत १९ कोटी रुपये खर्च करून करण्यात येणाऱ्या या कामामुळे पॉवर फॅक्टरमध्ये सुधारणा होणार आहे. शेतीसाठी योग्य दाबाचा वीजपुरवठा शक्य होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangola Water Crisis: सांगोल्यातील बंधारे कोरडे; जलसंकट वाढले

Farmer Compensation: बाधित शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी खलबते

Fruit Drop Subsidy Issue: संत्रा, मोसंबी, फळगळ अनुदानामध्ये गोंधळ

Fund Delay: स्थगितीला वाव देण्यासाठी निधी वर्ग करण्यास उशीर?

Maharajasva Campaign: महाराजस्व अभियान यशस्वी करण्यासाठी समन्वयाने काम करा: जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

SCROLL FOR NEXT