Agri Commissioner : कृषी आयुक्तालयाचा बदलला चेहरामोहरा

Commissionerate of Agriculture : कृषी आयुक्तालयात वर्षानुवर्षे वापरात असलेल्या जुनाट कक्षांचे नूतनीकरण करण्यात आले आहे. कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे आयुक्तालयाच्या प्रवेशद्वाराचा चेहरामोहरा बदलला आहे.
Commissionarate of Agriculture office
Commissionarate of Agriculture officeAgrowon
Published on
Updated on

Pune News : कृषी आयुक्तालयात वर्षानुवर्षे वापरात असलेल्या जुनाट कक्षांचे नूतनीकरण करण्यात आले आहे. कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे आयुक्तालयाच्या प्रवेशद्वाराचा चेहरामोहरा बदलला आहे.

पुण्याच्या ससून भागातील जुन्या मध्यवर्ती इमारतीत पहिल्या मजल्यावर कृषी आयुक्तालय आहे. ही इमारत ब्रिटिशकालीन असून, कृषीसह सर्व शासकीय कार्यालयांच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. आयुक्तालयातील विविध कक्षांच्या नूतनीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने सव्वा कोटी रुपयांचा प्राथमिक आराखडा तयार केला आहे. त्यात आयुक्तांच्या संमतीने महत्त्वाच्या कक्षांची दुरुस्ती व काही प्रमाणात नूतनीकरणाचा समावेश आहे.

Commissionarate of Agriculture office
Divisional Commissioner : मधुकरराजे आर्दड यांनी मराठवाडा विभागीय आयुक्तपदाचा स्विकारला कार्यभार

गुणनियंत्रण विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, की आयुक्तांच्या दालनाचे अप्रतिम नूतनीकरण करण्यात आले आहे. कृषी आयुक्तांचा मुख्य कक्ष राज्याच्या कृषी विभागाचे प्रतिनिधित्व करतो. परंतु त्याचे नूतनीकरण करण्यात आले नव्हते. आयुक्तांनी पुढाकार घेतल्यामुळे नूतनीकरण चांगले झाले असून, महसूल आयुक्तालयातील मुख्य कक्षाप्रमाणेच आता कृषी आयुक्तांचा कक्ष दिसतो आहे.

आयुक्तांचे मागील बाजूस दोन भारतीय तिरंगा ध्वज लावण्यात आले आहे. दूरदृश्‍यप्रणालीच्या माध्यमातून सतत महत्त्वाच्या बैठका आयुक्तांकडून घेतल्या जातात. त्यामुळे मोठा पडदा असलेला दूरदर्शन संच आता बसविण्यात आला आहे.

आयुक्तांच्या पुढाकारामुळे आयुक्तालयातील डॉ. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सभागृहाचेही रूप पालटले आहे. दहा वर्षांनंतर या सभागृहाचा वनवास संपला असून, आता उंची फर्निचर, उत्कृष्ट ध्वनिक्षेपण यंत्रणा, आरामदायी आसन व्यवस्थेमुळे या सभागृहात होणाऱ्या राज्यस्तरीय बैठका अधिक सुविधाजनक होणार आहेत.

पुण्यातील विविध शासकीय कार्यालये कॉर्पोरेट रूप घेत असताना कृषी आयुक्तालयातील धुळकट कक्ष कधी बदलले जाणार, असा प्रश्‍न काही अधिकारी उपस्थित करीत होते. यापूर्वी धीरज कुमार यांनी प्रत्यक्ष विविध कक्षांमध्ये फिरून स्वच्छता व नीटनेटकेपणाचा आग्रह धरला होता. परंतु त्यांनी नूतनीकरण केले नव्हते. विद्यमान आयुक्त श्री. चव्हाण यांनी मात्र नूतनीकरण करीत कृषी कर्मचाऱ्यांना आश्‍चर्याचा धक्का दिला आहे.

‘सर्जा-राजा’ला मिळाली नवी झूल

तत्कालीन कृषी आयुक्त उमाकांत दांगट यांच्या कार्यकालात कृषी आयुक्तालयात सर्जा-राजाच्या प्रतिकृतीची बैलजोडी बसविण्यात आली. त्यामुळे या परिसरात येताच गावशिवारात आल्याचा भास होतो. आयुक्तांच्या प्रवेशद्वाराकडे जाणाऱ्या मार्गाचे आता सुशोभीकरण करण्यात आले आहे. या मार्गावर उभ्या असलेल्या देखण्या सर्जा -राजाला आता नवी झूल देण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com