Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : पीकविम्याचा १७०० कोटींचा ‘अग्रिम’ मंजूर

Advance Crop Insurance : पावसाचा खंड पडल्याने खरीप हंगामासाठी पीकविमा कंपन्यांनी अखेर १७०० कोटी ७३ लाख रुपये देण्यास मंजुरी दिली आहे.

Team Agrowon

Agrim Pik Vima : अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या मध्यवर्ती प्रतिकूल हंगाम परिस्थिती अंतर्गत पीकविमा कंपन्यांनी अखेर १७०० कोटी ७३ लाख रुपये देण्यास मंजुरी दिली आहे. तरीही अजून हिंगोली, धुळे, वाशीम, लातूर, अमरावती, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांतील आक्षेपांवर विभागस्तरावर सुनावणी सुरू आहे. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

पीकविमा कंपन्यांनी काही जिल्ह्यांमध्ये आक्षेप घेतले होते. त्यावर राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीकडे सुनावणी झाल्यानंतर ३५ लाख ८ हजार शेतकऱ्यांना १७०० कोटी रुपये वितरित करण्यात येणार आहेत. या वर्षी राज्य सरकारने एक रुपयात पीकविमा योजना राबविल्याने १ कोटी ७० लाख शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.

मात्र विमा कंपन्यांनी यंदा प्रतिकूल परिस्थिती असतानाही अग्रिम रक्कम देण्यास नकार दिला. त्यामुळे जिल्हा, विभाग स्तरावर सुनावणी झाल्यानंतर राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीकडे अपील करण्यात आले. अतिरिक्त मुख्य सचिव अनुपकुमार यांनी जलदगतीने या प्रकरणाची सुनावणी घेऊन अग्रिम रक्कम देण्याचे आदेश दिले होते.

जळगाव, चंद्रपूर, सांगली, नंदूरबार, बीड, बुलडाणा या जिल्ह्यांतील आक्षेप मागे घेण्यात आले आहेत. नागपूर, परभणी, जालना, कोल्हापूर, अकोला, धाराशिव या जिल्ह्यांत पीकविमा कंपन्यांनी आक्षेप घेतले नव्हते. हिंगोली, धुळे, पुणे आणि वाशीममध्ये आक्षेप घेण्यात आले आहेत. त्यावर विविध स्तरांवर सुनावणी सुरू आहे.

नाशिक जिल्ह्यातील सोयाबीन, मका बाजरी या पिकांसाठी अग्रिम मान्य करण्यात आला. मात्र कापूस आणि इतर पिकांसाठी अमान्य करण्यात आला आहे. नगर येथे सोयाबीन आणि मक्याचा अग्रिम मान्य केला आहे.

तर कापूस व इतर पिकांसाठी तो अमान्य केला आहे. सोलापूर जिल्ह्यातील सोयाबीन, मका पिकासाठी अग्रिम मिळणार आहे. सातारा जिल्ह्यात बाजरी, भात, नाचणीसाठी अग्रिम मान्य आहे. तर इतर पिकांसाठी अमान्य करण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मका, सोयाबीनसाठी मान्य तर इतर पिकांना अमान्य करण्यात आला आहे लातूर जिल्ह्यातील ६० मंडलांपैकी ३२ मंडलांना अग्रिम मान्य केला आहे. तर २८ मंडलांना तो अमान्य केला आहे. या जिल्ह्याची विभागस्तरावर सुनावणी प्रलंबित आहे.

जिल्हानिहाय मंजूर अग्रिम रक्कम (कंसात शेतकरी संख्या)

नाशिक-रक्कम-१५५.७४ कोटी (३ लाख ५० हजार)

जळगाव-४ कोटी ८८ लाख (१६,९२१)

नगर-१६० कोटी २८ लाख (२ लाख २१ हजार ८३१ )

सोलापूर-१११ कोटी ४१ लाख (१ लाख ८२ हजार ५३४)

सातारा-६ कोटी ७४ लाख (४० हजार ४०६)

सांगली-२२ कोटी ४ लाख (९८ हजार ३७२)

बीड-२४१ कोटी २१ लाख (७ लाख ७० हजार ५७४)

बुलडाणा-१८ कोटी ३९ लाख (३६,३५८)

धाराशिव-२१८ कोटी ८५ लाख (४ लाख ९८ हजार ७२० )

अकोला-९७ कोटी २९ लाख (१ लाख ७७ हजार २५३)

कोल्हापूर-रक्कम -१३ लाख (२२८)

जालना-७६० कोटी ४८ लाख (३ लाख ७० हजार ६२५)

परभणी-२०६ कोटी ११ लाख (४ लाख ४१ हजार ९७०)

नागपूर-५२ कोटी २१ लाख (६३ हजार,४२२)

लातूर-२४४ कोटी ८७ लाख (२ लाख १९ हजार ५३५ )

अमरावती-८ लाख (१० हजार २६५ )

एकूण लाभार्थी शेतकरी संख्या-३५ लाख ८ हजार ३०३

मंजूर रक्कम-१७०० कोटी ७३ लाख रुपये

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT