Nashik Farmers agrowon
ॲग्रो विशेष

Nashik Farmers : मोजणीत जास्त भरलेली १७ गुंठे जमीन मूळ मालकाला केली परत

Nashik Land Calculation : सोमठाणे येथील गोदावरी उजव्या कालव्यालगत मेंढी शिवरस्त्याला मधुकर सूर्यभान धोक्रट यांची २८२ या गटात साडेदहा एकर जमीन आहे.

sandeep Shirguppe

Sinnar Nashik Farmers : शेतीचे बांध, गुंठाभर जमिनीवरून अनेक ठिकाणी सख्ख्या भावांमध्ये येणारे वितुष्ट अवतीभवती नेहमीच बघायला मिळते. मात्र, वर्षानुवर्षे वहिवाटीला असलेली दुसऱ्यांची तब्बल साडे सतरा गुंठे शेत जमीन मोजणीनंतर प्रामाणिकपणे मूळ मालकाला परत केल्याची घटना सिन्नर तालुक्यातील सोमठाणे येथे घडली. कुठेही अडवणूक न करता किंवा वाद न घालता धोक्रट कुटुंबाने केलेली ही कृती समाजापुढे आदर्श घालून देणारी ठरली आहे.

सोमठाणे येथील गोदावरी उजव्या कालव्यालगत मेंढी शिवरस्त्याला मधुकर सूर्यभान धोक्रट यांची २८२ या गटात साडेदहा एकर जमीन आहे. त्या जमिनीलगत २८३ व २८४ हे छोटे भूमापन गट असून ज्योती व रामेश्वर सोपान कोकाटे या पती-पत्नीच्या नावावर साडेसहा एकर जमीन आहे. धोक्रट कुटुंब अनेक वर्षे ही शेती कसत नव्हते. त्यामुळे गेली पंधरा ते वीस वर्षे ती पडीक होती.

वहिवाट नसल्यामुळे सर्व गटातील बांध वेडेवाकडे झाले होते. कोणाचे क्षेत्र कोणाकडे आहे हे समजण्यास वाव नव्हता. खात्री करण्यासाठी या जमिनीची रामेश्वर कोकाटे यांनी मोजणी करून घेतली.

मोजणी अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार साडे सतरा गुंठे क्षेत्र हे धोक्रट यांच्याकडे निघाले. सोमठाणे येथे औषध विक्रेते असलेल्या मधुकर धोक्रट यांनीही जमीन मोजणीबाबत कुठल्याही प्रकारे अपील न करता मोजणी अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार रामेश्वर कोकाटे यांना त्यांच्या मालकीचे साडे सतरा गुंठे जमीन क्षेत्र बांध टाकून काढून दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy procurement : देशात ११ महिन्यांत धान खरेदी ४ टक्के अधिक, अतिरिक्त साठा विकण्याची सरकारची तयारी

Turmeric Farming: हळदीची पाने पिवळी पडण्यामागील कारणे, उपाय

Free Flour Mill Scheme: मोफत पीठ गिरणी योजना; महिलांसाठी संधी, आजच अर्ज करा!

Sugarcane Farming: उसासाठी संतुलित अन्नद्रव्यांचा वापर

PM Kisan 21st Installment : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मिळू शकते खुशखबर?; पीएम किसानच्या २१ व्या हप्त्यापूर्वी तुमचे स्टेटस तपासा, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रक्रिया

SCROLL FOR NEXT