Rabi Sowing  Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Sowing : नगर जिल्ह्यात आतापर्यंत रब्बीची १६ टक्के पेरणी

Rabi Season : आतापर्यंत सरासरीच्या १६ टक्के म्हणजे ७४ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यात ज्वारीची ७० हजार ५४५ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

Team Agrowon

Nagar News : जिल्ह्यात रब्बीच्या पेरणीला सुरुवात झाली आहे. ओलावा कमी असल्याने पेरणीला अडचणी येत असली तरी यंदा पहिल्यादाच कोरडवाहू भागात पेरण्याला वेग येत आहे. आतापर्यंत सरासरीच्या १६ टक्के म्हणजे ७४ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यात ज्वारीची ७० हजार ५४५ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

नगर जिल्ह्यात रब्बीचे ४ लाख ५८ हजार ६३५ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. यंदा सुरुवातीपासूनच पुरेसा पाऊस नाही. त्यात पाऊस उघडून पंधरा दिवसांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. दरवर्षी परतीच्या पावसाने वापसा होत नसतो. यंदा मात्र पहिल्यांदाच पावसाअभावी जमिनीतील अल्प ओलाव्यावर पेरणी करण्याची वेळ आली आहे.

जमिनीत ओलावा नसल्याने पेरणी करताना अडचणी येत आहेत. त्यावर मात करत पेरण्या सुरू झाल्या आहेत. आत्तापर्यंत रब्बीची सरासरीच्या सोळा टक्के पेरणी झाली आहे. त्यात सर्वाधिक २७ टक्के म्हणजे ७० हजार ५४५ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

गव्हाची सरासरीच्या पाच टक्के म्हणजे ४३ हेक्टर, मकाची १२ टक्के म्हणजे १६७२ हेक्टर, हरभऱ्याची १.३९ टक्के म्हणजे १२२५ हेक्टर, करडईची १७ हेक्टरवर, जवसाची सहा हेक्टरवर, सूर्यफुलाची २ हेक्टरवर पेरणी झाली असून तिळाची पेरणीच झाली नाही.

परतीचा पाऊस गेला असला तरी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. काही प्रमाणात पाऊस झाला तरी पेरणीला वेग येईल. आत्तापर्यंत सर्वाधिक पारनेर तालुक्यात पेरणी झाली. पाच तालुक्यांत केवळ एक टक्काही पेरणी नाही असा कृषी विभागाचा अहवाल सांगतो.

तालुकानिहाय पेरणी (हेक्टरी)

नगर ः १७.०१, पारनेर ः ४४.१५, श्रीगोंदा ः २.२६, कर्जत ः २०.९, जामखेड ः २७.१६, शेवगाव ः १.५५, पाथर्डी ः १६.२७, नेवासा ः १.३२, राहुरी ः ०.९१, संगमनेर ः ०.८८, अकोले ः ०.१९, कोपरगाव ः ०.२४, श्रीरामपूर ः ०.३८, राहाता ः २.०५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ujani Floating Solar Project: उजनी जलाशयावर केवळ नऊ टक्के क्षेत्रावरच ‘फ्लोटिंग सोलार’ प्रकल्प; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे स्पष्टीकरण

Wild Boar Attack: शेतशिवारात रानडुकरांचा हैदोस; कपाशी पिकाचे नुकसान

Drought Management: बांधबंदिस्ती, जलसंधारण, पीक नियोजनानेच दुष्काळावर मात शक्य; पोपटराव पवार

Ahilyanagar District Bank Election: अहिल्यानगरला जिल्हा बॅंकेच्या दहा जागांसाठी उद्या मतदान; एकूण सत्तावीस उमेदवार; मंगळवारी मतमोजणी

Maize Trading: चांदूरबाजारमध्ये मक्याची उलाढाल वाढली

SCROLL FOR NEXT