Cooperative Society Loan agrowon
ॲग्रो विशेष

Cooperative Society Loan : १३ शेती पाणीपुरवठा संस्थांकडे १६ कोटी ७१ लाख थकीत, कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांची मंत्रालयात धाव

sandeep Shirguppe

Kolhapur Agriculture News : कोल्हापूर जिल्ह्यातील शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या १३ सहकारी पाणीपुरवठा संस्थांकडे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे १६ कोटी ७१ लाख ६६ हजार रुपये कर्ज आहे. जिल्हा बँक व राष्ट्रीयीकृत बँकेच्या थकीत कर्जाची सरसकट माफी व्हावी, या मागणीसाठी अनेक वर्षांपासून मंत्रालयापर्यंत पाठपुरावा केला जात आहे.

१३ संस्था वाढीव वीज बिले, देखभाल दुरुस्ती खर्च, कामगार पगार, कमी झालेल्या भिज क्षेत्रामुळे डबघाईला येऊन बंद पडलेल्या आहेत. संस्था बंद असल्याने त्यांना कर्जाची परतफेड करणे अशक्य झाले आहे.

जिल्ह्यातील श्री राम पाणीपुरवठा संस्था गंगापूर (ता. भुदरगड), रमामाता कुंभोज (ता. हातकणगले), जवाहर शिये (ता. करवीर), महादेव म्हालसवडे व विठ्ठलाई चाफोडी (ता. करवीर), भैरवनाथ व्हन्नूर व नागनाथ सोनाळी (ता. कागल),दत्त पुनाळ, हनुमान अतकीरवाडी व महालक्ष्मी आरळे (ता. पन्हाळा), हनुमान तळाशी, जोतिर्लिंग मांगोली व वसंतदादा राशिवडे (ता. राधानगरी). या १३ संस्थांची १६ कोटी ७१ लाख ६६ हजार रुपये थकबाकी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे आहे. राज्यात दोन हजार ६५९ नोंदणीकृत संस्था असून, यातील २४२ थकीत आहेत. यातील १४५ संस्था बंद आहेत.

जिल्हा बँक व पाणीपुरवठा संस्थांचे संचालक मंडळ यांच्यातील वाद न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. संचालक मंडळाची स्थावर मालमत्ता जप्त होण्याची शक्यता असून, यातून मुक्त होण्यासाठी शेतकऱ्यांनी मंत्रालयापर्यंत धाव घेतली आहे. अनेक वर्षांपासून न्यायासाठी प्रयत्न सुरू असून, कर्जमाफी करून शेतकरी वाचवावा, अशी मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार प्रकाश आबिटकर यांच्याकडे केली आहे.

नांदेडच्या धर्तीवर कर्ज माफ करा..

काही संस्थांचे कर्ज माफ झाले आहे, तर काहींचे झाले नाही. पाणीपुरवठा संस्था उभारताना प्रकल्प खर्च जास्त येतो. त्यामुळे सरकार २८ फेब्रुवारी २०१४ च्या शुद्धिपत्रकानुसार प्रकल्प खर्चाच्या २५ टक्के किंवा एक कोटी रुपये यापैकी जी रक्कम जास्त असेल तेवढे अनुदान देते; परंतु काही संस्था पूर्णतः बंद अवस्थेत आहेत. त्यांचे थकीत कर्ज, त्याचे व्याज, चक्रवाढ व्याज मर्यादेपलीकडे वाढले आहे. त्यामुळे अशा संस्थांचे नांदेडच्या धर्तीवर सर्व कर्ज माफ करण्यासाठी प्रस्ताव दिला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंद असलेल्या पाणीपुरवठा संस्थांना शंभर टक्के कर्जमाफी व सुरू असलेल्या संस्थांना ५० टक्के कर्जमाफी करण्यात येईल, असे बैठकीत सांगितले होते. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यातील संस्थांना याचा फारसा लाभ होणार नाही. संस्थांची थकीत कर्जे कोट्यवधी रुपयांची असल्याने निम्मे कर्जही फेडणे शक्य होणार नाही. त्यामुळे सरसकट कर्जमाफी व्हावी, याबाबत मंत्रालयस्तरावर पाठपुरावा सुरू आहे.

संस्थानिहाय कर्जाची रक्कम

- श्री राम पाणीपुरवठा संस्था, गंगापूर (२ कोटी १३ लाख १३ हजार)

- रमामाता पाणीपुरवठा संस्था, कुंभोज (३२ लाख ९३ हजार)

- जवाहर पाणीपुरवठा संस्था, शिये (१ कोटी २९ लाख ९४ हजार)

- महादेव पाणीपुरवठा संस्था, म्हालसवडे (३० लाख ७२ हजार)

- विठ्ठलाई पाणीपुरवठा संस्था, चाफोडी (६ लाख ३० हजार)

- भैरवनाथ पाणीपुरवठा संस्था, व्हन्नूर (१ कोटी ११ लाख २५ हजार)

- नागनाथ पाणीपुरवठा संस्था, सोनाळी (२ कोटी ८९ लाख ४० हजार)

- दत्त पाणीपुरवठा संस्था, पुनाळ (२ कोटी ३७ लाख ३४ हजार)

- हनुमान पाणीपुरवठा संस्था, अतकिरवाडी (३६ लाख ५१ हजार)

- महालक्ष्मी पाणीपुरवठा संस्था, आरळे (१ कोटी ९८ लाख ४४ हजार)

- हनुमान पाणीपुरवठा संस्था, तळाशी (१ कोटी ७६ लाख ६५ हजार)

- ज्योतिर्लिंग पाणीपुरवठा संस्था, मांगोली (६६ लाख १४ हजार)

- वसंतदादा पाणीपुरवठा संस्था, राशिवडे (१ कोटी ४२ लाख ९१ हजार)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Cotton Anudan : २६ सप्टेंबरपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सोयाबीन, कापूस अनुदान जमा होणार; कृषिमंत्री मुंडेंनी दिली माहिती

Agriculture Power Bill : कृषी वीज बिले दुरूस्त करा अन्यथा आंदोलन, इरिगेशन फेडरेशनकडून इशारा

Agriculture Management : पुरातही पिके वाचविणारी ‘एसआरटी’ पद्धत

Agriculture Import Export : आयात-निर्यातीत हवी समयसूचकता

PM Kisan Scheme : पी.एम.किसान योजना; अठराव्या हप्त्यास शेतकरी मुकणार, तेरा हजार खाती आधार लिंकविना

SCROLL FOR NEXT