PM Kisan News agrowon
ॲग्रो विशेष

PM Kisan News : पीएम किसानचा १५ वा हफ्ता १५ नोव्हेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा

PM Kisan : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा १५ वा हफ्ता १५ नोव्हेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

sandeep Shirguppe

PM Kisan Samman Nidhi : केंद्र सरकारकडून मागच्या ५ वर्षांपासून पीएम किसान अंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला तीन हफ्त्यात ६ हजार रुपये दिले जातात. दरम्यान यंदाच्या वर्षातील पीएम किसानचा शेवटचा १५ वा हफ्ता मिळण्याची प्रतीक्षा आता संपली आहे.

दिवाळी संपल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याचे बोलले जात होते. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा १५ वा हफ्ता १५ नोव्हेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला सुरुवात केली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात. आतापर्यंत १४ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर नोंदणी करून शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेच्या पंधराव्या हफ्त्याची रक्कम जमा होणार आहे. परंतु ज्यांना याचा लाभ मिळत नाही त्यांनी ईकेवायसी करणे गरजेचे आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा १५ वा हप्ता १५ नोव्हेंबर २०२३ ला देशभरातील करोडो शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवला जाणार आहे. जर तुम्हीही पीएम किसानच्या १५ व्या हप्त्याची वाट पाहत असाल, तर लाभार्थी यादीत तुमचे नाव एकदा नक्की तपासा.

लाभार्थी यादीत तुमचं नाव तपासा

पीएम किसान वेबसाइट https://pmkisan.gov.in/ ला भेट द्या

पेमेंट सक्सेस टॅबच्या खाली तुम्ही भारताचा नकाशा पाहू शकाल.

उजव्या बाजूला पिवळ्या रंगाचा टॅब डॅशबोर्ड दिसेल, त्यावर क्लिक करा

तुम्हाला तुमचा संपूर्ण तपशील डॅशबोर्ड टॅबवर भरा.

राज्य, जिल्हा, उपजिल्हा आणि पंचायत निवडा.

यानंतर तुम्ही तपशील निवडू शकता.

या योजनेची स्थिती पाहा

पीएम किसान वेबसाइटला https://pmkisan.gov.in/ भेट द्या

'तुमची स्थिती जाणून घ्या' (Know Your Status) या पर्यायावर क्लिक करा

नोंदणी क्रमांक आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करा.

Get data वर क्लिक करा

आता तुम्हाला स्टेटस दिसेल. ज्यामुळे तुम्ही लाभार्थी यादीत आहात की नाही हे स्पष्ट होईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Subsidy: खोडवा उसातील पाचट शेतीसाठी खते, औषधांसाठी ५० टक्के अनुदान

Sesame Production: खानदेशात तीळ उत्पादन कमी

Farmer Participation: धोरणात्मक निर्णयात हवा शेतकऱ्यांचा सहभाग

National Education Policy 2020: कोणत्याही भाषेची जबरदस्ती नाही

Paddy Harvesting: भात कापणीसाठी यांत्रिकीकरणाकडे कल

SCROLL FOR NEXT