PM Kisan : पीएम किसानबाबत महत्वाची केवायसी आता मोबाईवर करता येणार

PM Kisan Mobile App : पीएम किसानचे पैसे मिळत नसलेल्या शेतकऱ्यांना आता शेतकऱ्यांना मोबाइल अॅपवर 'फेस ऑथेन्टिकेशन' द्वारे स्वतःसह इतर दहा शेतकऱ्यांची केवायसी पूर्तता करता येणार
PM Kisan
PM Kisanagrowon
Published on
Updated on

Agriculture News : केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान म्हणून वर्षाला ६ हजार रुपये पीएम किसान अंतर्गत दिले जातात. दरम्यान अद्यापही काही शेतकरी या योजनेपासून वंचीत आहेत. यामुळे केंद्र सरकारकडून याबाबत आवाहन करण्यात येते. कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास ३० हजार ५१९ शेतकरी पीएम किसानच्या लाभापासून दूर असल्याची माहिती समोर आलीय.

पीएम किसानचे पैसे मिळत नसलेल्या शेतकऱ्यांना आता शेतकऱ्यांना मोबाइल अॅपवर 'फेस ऑथेन्टिकेशन' द्वारे स्वतःसह इतर दहा शेतकऱ्यांची केवायसी पूर्तता करता येणार आहे. दरम्यान दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसानचा १५ वा हफ्ता येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वीच आपली केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

देशातील शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये केंद्र सरकारने योजना सुरू केली. जिल्ह्यात सध्या ४ लाख ६९ हजार ५१३ शेतकरी या योजनेचा लाभ घेतात. त्यातील ४ लाख ३८ हजार ९९४ शेतकऱ्यांनी (९३ टक्के) 'ई-केवायसी' पूर्ण केले आहे.

अद्याप ३० हजार ५१९ शेतकऱ्यांनी त्याची पूर्तता केलेली नाही. सरकारने संबंधित शेतकऱ्यांना अनेक वेळा मुदतवाढ देऊनही शेतकऱ्यांनी ई- केवायसी केलेली नाही. आतापर्यंत १४ हप्ते आले असून, साधारणतः ७ नोव्हेंबरपर्यंत १५वा हप्ता येणार आहे. तत्पूर्वी शेतकऱ्यांनी ई- केवायसी पूर्तता करण्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न सुरू केले आहेत.

मोबाइलमधून ई-केवायसी गुगल प्ले स्टोर मधून पी. एम. किसान जीओआय अॅपचा वापर करून 'फेस ऑथेन्टिकेशन' द्वारे 'ई-केवायसी' करता येऊ शकते. अधिक माहितीसाठी स्थानिक कृषी अधिकाऱ्यांची संपर्क साधावा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com