Agriculture News Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture News : महाराष्ट्राप्रमाणेच हिमाचलचे १५० युवा शेतकरी जाणार जापान दौऱ्यावर

Himachal farmers on tour to Japan : हिमाचल कृषी विकास समितीकडून युवा शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत शिमला येथे झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला असून यासाठी १५० युवा शेतकऱ्यांची निवड करण्यात येईल.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : शेतकरी विकसीत व्हावेत आणि त्यांच्याकडून आधुनिक शेती केली जावी यासाठी महाराष्ट्र सरकारकडून विविध योजना आखल्या जात आहेत. तर २००४ सालापासून शेतकऱ्यांसाठी विविध देशांत परदेश दौरे आखले जात आहेत. यंदा देखील राज्यातील १२० शेतकऱ्यांना परदेश दौऱ्याची संधी मिळणार असून सरकार यावर एक कोटी ४० लाख रुपये खर्च करणार आहे. असाच खर्च आता हिमाचल प्रदेश सरकारकडून त्यांच्या शेतकऱ्यांसाठी केला जाणार आहे. तर त्यांनी परदेश दौऱ्यासाठी जापानची निवड केली असून १५० तरुणांना जापानला पाठवले जाणार आहे.

हिमाचल प्रदेशमधील १५० तरुण शेतकरी आधुनिक शेती तंत्र शिकण्यासाठी जपानला जाणार आहेत. या परदेश दौऱ्याला जपानची सरकारी एजन्सी जेआयसीएकडून वित्तपुरवठा केला जाणार आहे. राज्याच्या ६०० कोटी रुपयांच्या स्टार्टअप योजनेप्रमाणे कृषी क्षेत्रातील तरुणांना रोजगार देण्यासाठी मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी ही योजना आखली आहे.

योजनेची अट

आधुनिक शेतीच्या प्रशिक्षणासाठी जपानला जाणाऱ्या या तरुणांचे किमान शिक्षण हे १२ वी असले पाहिजे आणि ते कृषी व्यवसायात असावेत अशी अट यासाठी आहे. तर या तरूण शेतकऱ्यांची निवड राज्य कौशल्य विकास महामंडळाद्वारे केली जाईल.

१५० तरुणांना संधी

आधुनिक शेती तंत्र शिकण्यासाठी २०२६ पर्यंत हिमाचलमधील सुमारे १५० तरुण जापान दौरा करणार आहेत. पण हा दौरा एकाच वेळी नसणार असून तो वेगवेगळ्या बॅचमध्ये होणार आहे.

सहा महिन्यांचे प्राथमिक प्रशिक्षण

जापान दौऱ्यासाठी ज्या ज्या तरुण शेतकऱ्यांची निवड होईल त्यांना सहा महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण दिले जाणार आहे. हे प्रशिक्षण कौशल्य विकास महामंडळातर्फे देण्यात येणार आहे. यामध्ये त्यांना महामंडळातर्फे जपानी नीतिमत्ता, कायदा, संस्कृती, भाषा आदींचे संपूर्ण ज्ञान दिले जाणार आहे. तसेच प्रशिक्षण आणि चाचणीनंतर उत्तीर्ण होणाऱ्या तरुण शेतकऱ्यांनाच जपानला पाठवले जाणार आहे. तर या योजनेला अॅग्रीकल्चर इंटर्न असे नाव देण्यात आले आहे.

दरमहा मिळणार एक लाख रुपये

जपानमध्ये प्रशिक्षणादरम्यान त्यांना प्रशिक्षण भत्ता म्हणून दरमहा एक लाख रुपये मानधन दिले जाणार आहे. तसेच तेथे त्यांच्यासाठी जापानमध्येच स्थायिक होण्याचा मार्ग देखील खुला करण्यात आला आहे. तर परत येणाऱ्यांसाठी शेतीवर आधारित व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारकडून मदत दिली जाणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Heavy Rain: घाटमाथ्यावर जोरदार सरी

Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाचा जोर वाढणार; कोकण, घाटमाथ्यावर ‘ऑरेंज अलर्ट’

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

SCROLL FOR NEXT