Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक; मंत्र्यांचे दौरे रद्द!

सर्वोच्च न्यायलयाने गुरुवारी (ता.२०) राज्य सरकारने दाखल केलेली मराठा आरक्षणासंदर्भातील पुनर्विचार याचिका फेटाळली आहे. त्यामुळे राज्य सरकारला मोठा झटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Maratha Reservation
Maratha ReservationAgrowon

Maratha Reservation Update : सर्वोच्च न्यायलयाने गुरुवारी (ता.२०) राज्य सरकारने (State Government) दाखल केलेली मराठा आरक्षणासंदर्भातील पुनर्विचार याचिका फेटाळली आहे. त्यामुळे राज्य सरकारला मोठा झटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी आज (ता.२१) दुपारी १ वाजता मंत्र्यांची बैठक बोलावली आहे.

मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने समिती नेमली होती. या समितीमध्ये काही मंत्र्यांचाही समावेश आहे. याच मंत्र्यांची आज बैठक सह्याद्री अतिथीगृहावर बोलावली आहे.

सगळे कार्यक्रम रद्द करून तातडीने मुंबईमध्ये हजर राहा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य सरकारच्या मंत्र्यांना दिले आहेत. मुख्यमंत्र्यांचा आदेश येताच मंत्री आपला दौरा अर्धवट सोडून मुंबईच्या दिशेन रवाना झाले आहेत.

Maratha Reservation
Maratha Reservation : मराठा आरक्षण बैठक गोंधळात गुंडाळली

या बैठकीत मुख्यमंत्री संपूर्ण आढावा घेणार आहेत. बैठकीसाठी मंत्री उदय सांमत, शंभुराजे देसाई यांच्यासह इतर मंत्री उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

सर्वोच्च न्यायलयाने मराठा आरक्षण याचिका फेटळल्याने राज्य सरकार पुढच्या न्यायलयीन लढाईची रणनीती आजच्या बैठकीत ठरवली जाऊ शकते.

मराठा आरक्षण याचिका फेटाळल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माध्यमांशी बोलताना मराठा आरक्षणासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. "मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आमचे सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे. त्यासाठी लागेल ते करू. भोसले समितीने दिलेल्या सूचनांवर आम्ही काम करत आहोत." असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

दरम्यान, राज्य शासनातर्फे जून २०२१ मध्ये मराठा आरक्षण पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आलेली होती.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com