Cotton Picking  Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Picking : कापूस वेचणीसाठी १५० ते २०० रुपये मजुरी दर

Cotton Crop : खानदेशात मजूरटंचाई यंदाच्या खरिपात कायम आहेच. यातच मागील आठवड्यात पूर्वहंगामी किंवा बागायती कापूस पिकात वेचणी सुरू झाली आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात मजूरटंचाई यंदाच्या खरिपात कायम आहेच. यातच मागील आठवड्यात पूर्वहंगामी किंवा बागायती कापूस पिकात वेचणी सुरू झाली आहे. वेचणीसाठी शेतकऱ्यांना यंदाही मोठा मोबदला द्यावा लागत आहे. १५० ते २०० रुपये रोज, असे मजुरी दर सध्या आहेत.

सध्या सकाळी आठ ते १.३० या कालावधीत कामासाठी १५० रुपये रोज, अशी मजुरी घेतली जात आहे. तर सकाळी नऊ ते दुपारी चार यादरम्यान कामासाठी २०० रुपये रोज, अशी मजुरी काही गावांत शेतकरी देत आहेत. या कालावधीत जेवण व पाणी पिण्यासाठी काही वेळ अवकाशही असतो. मागील वर्षीदेखील एवढीच मजुरी होती. मागील वर्षी कापूस दरांबाबत हवा तयार करण्यात आली होती.

काही जिनिंग प्रेसिंग कारखानदार, व्यापारी, दलालांनी दोन-पाच किलो कापसाची ११ हजार, ११ हजार ९०० रुपये प्रतिक्विंटल या दरानुसार खरेदी करून प्रसिद्धी मिळविली होती. यामुळे मजुरी दर मागील वर्षी १५ ते २० टक्के वाढले. शिवाय मजूरटंचाई कायम होती. यंदा मागील वर्षीची मजुरी कायम आहे. हे मजुरी दर कापसाला सात हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर असताना परवडत नाहीत, असा मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत.

सध्या कापसात पाऊस आणि ढगाळ वातावरण यामुळे बोंडे उमलण्याची प्रक्रिया रखडत सुरू आहे. मध्येच पाऊस येत आहे. बोंडे अधिकचे उमलत नसल्याने प्रतिकिलोनुसार मजुरी दर कुठेही दिले जात नसल्याची माहिती आहे. मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये प्रतिकिलोनुसार मजुरी दर देण्यास सुरवात झाली होती. यंदाही पुढील १० ते १२ दिवसांत कापूस पिकात बोंडे अधिक संख्येने उमलल्यानंतर प्रतिकिलोनुसार कापूस वेचणीला मजूर तयार होतील. त्या वेळेस मजुरी दर आणखी वेगळे राहतील, अशीही माहिती आहे.

सध्या प्रतिरोज यानुसार मजुरी दिली जात आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा, यावल, जळगाव, धरणगाव, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील शहादा, तळोदा तालुक्यांत कापूस वेचणी काही भागात सुरू आहे. मे अखेरीस लागवड केलेल्या कापूस पिकात ही वेचणी सुरू असून, पुढे वेचणीचे काम आणखी वाढेल, असेही दिसत आहे.

मजूरटंचाई असल्याने यावल, चोपडा, शिरपूर, शहादा भागांतील शेतकरी ट्रॅक्टर, प्रवासी वाहने पाठवून मध्य प्रदेशातून मजूर आणत आहेत. मजुरांची ने-आण याचा खर्च शेतकऱ्यांना करावा लागत आहे. यामुळे उत्पादन खर्च आणखी वाढत आहे. काही गावांत मजुरांचे मोठे गट आहेत. रोज हलका ते मध्यम पाऊस येत असल्याने कापसाचे नुकसान होऊ नये यासाठी शेतकरी वेचणीच्या धावपळीत आहेत.

मागील वर्षी कापूस वेचणीचे जे दर होते, तेच दर यंदा आहेत. मागील वर्षी कापसाला १० हजार रुपये दर मिळेल, या अपेक्षेने मजुरीचे हवे तसे दर शेतकरी देत होते. पण आता सात हजार रुपये कापसाचे दर आहेत. या दरात कापूस वेचणीची मजुरी शेतकऱ्यांना न परवडणारी आहे.
- रमेशभाई पटेल, शेतकरी, शहादा, जि. नंदुरबार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Family Compensation: आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना तातडीने मदत; २५ कोटी मंजूर

Fake Fertilizer Sale: भोकरमध्ये बनावट खत विक्रीचा पर्दाफाश

Heavy Rainfall Impact: वादळाचा वीज महावितरणला झटका

Fertilizer Supply Issue: मंजूर साठ्यापेक्षा ४ हजार ४२८ टन कमी खताचा पुरवठा

Kharif Season Preparation: खरीप हंगामासाठी गावोगावी तयारीला वेग

SCROLL FOR NEXT