Marigolds Flower agrowon
ॲग्रो विशेष

Marigolds Flower : कोल्हापुरात झेंडू दरात तेजी, फूल उत्पादक शेतकरी समाधानी, इतर फुलांचे दरही वाढले

Flowers Rate : नवरात्र उत्सवामध्ये मागिल चार ते पाच दिवसांपासून फुलांचा बाजार फुलला आहे. मंडळाच्या सजावटीसाठी फुलांची मागणी वाढल्याने फुलांचे दर वाढले आहेत.

sandeep Shirguppe

Kolhapur Flower Rate : नवरात्र उत्सवामध्ये मागील चार ते पाच दिवसांपासून फुलांचा बाजार बहरला आहे. मंडळाच्या सजावटीसाठी फुलांची मागणी वाढल्याने दरही वाढले आहेत. गेल्या आठवड्यात ४० रुपये किलो मिळणारी झेंडूची फुले आता १५० ते २०० रुपयांना व्यापाऱ्यांकडून जात आहे.

तर शेतकऱ्यांकडून थेट बाजारात ६० ते १०० रुपयांपर्यंत विक्री केली जात आहे. झेंडूसोबतच इतरही फुलांचे दर वाढले आहेत. नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी फुलांचे दर दुपटीने वाढल्याने फूल उत्पादक शेतकरी समाधानी आहे.

झेंडू, गुलाब, पांढरी शेवंती, गलांडा, निशिगंध, कमळ, छोट्या गुलाब फुलांचे दर वाढले आहेत. बाजारात फुलांची चांगली आवक आहे. मागणीमुळे फुलांच्या दरात दुप्पट वाढ झाली आहे. मोठ्या आकाराची मूर्ती असलेल्या सार्वजनिक दुर्गा देवी मंडळांसह, घरगुती फुलांची मोठी मागणी आहे. फुले महागल्याने हारांचे दरही वाढले आहेत.

हारांचे दर किमान ५० ते २५० रुपयांपर्यंत वाढले आहेत. सार्वजनिक मंडळाच्या मोठ्या दुर्गामातेच्या मूर्तीसाठीचे हारांचे दर किमान २५० पासून २ हजारांपर्यंत आहेत. घटस्थापनेसाठी झेंडूच्या आणि निशिगंधाच्या फुलांना जास्त मागणी असल्यानेही दर वाढले आहेत. ही दरवाढ कायम राहणार असून, दसऱ्यादिवशीही फुलांचे दर वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

फुलांचे दर (प्रतिकिलो)

झेंडू १५० ते २००, गुलाब १० ते २० एक, पांढरी शेवंती ३००, गलांडा ३६०, निशिगंध ९० ते १००, कमळ ३० ते ४०, छोटी गुलाबाची फुले ३००, जरबेरा १२०.

शेतकरी ते ग्राहक विक्रीने चांगला फायदा

झेंडू उत्पादक शेतकरी सचिन चपाले म्हणाले की, आम्ही १२ महिने झेंडूचे उत्पादन घेत असतो. मागच्या दोन महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने नुकसान झाले आहे. काही अंशी उत्पादनावर परिणाम झाला असला तरी झेंडूला चांगला दर मिळत आहे. बाजारात जात थेट ग्राहकांना झेंडू विकत असल्याने आम्हाला किलोला ५० रुपये ते ६० रुपये प्रमाणे दर मिळत असल्याचे मत चपाले यांनी व्यक्त केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Turmeric Market: हळदीचे वायदे बंद करण्याची व्यापाऱ्यांची मागणी

Maharashtra Rain: राज्यात २३० मंडलांत अतिवृष्टी

Vidarbha Crop Loss: विदर्भात दोन लाख हेक्टरवर पीक नुकसान

Heavy Rain Alert: कोकण, घाटमाथ्यावर मुसळधारेचा इशारा

Soyabean Crop Damage: सोयाबीनवर कीटकनाशक फवारलं, सोयाबीन जळालं; केंद्रीय कृषिमंत्र्याचे कारवाईचे आदेश

SCROLL FOR NEXT