Agriculture Input
Agriculture Input Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Inputs : अप्रमाणित निविष्ठाप्रकरणी १५० न्यायालयीन दावे

Team Agrowon

Yavatmal News : गतवर्षीच्या खरीप हंगामात गुणनियंत्रण विभागाकडून कृषी केंद्रांची झाडाझडती घेण्यात आली. त्या माध्यमातून नमुने घेत ते प्रयोगशाळांकडे पाठविण्यात आले. यातील २३७ नमुने अप्रमाणीत आढळून आले असून १५० प्रकरणात न्यायालयीन दावे दाखल करण्यात आले आहेत. उर्वरित ९० प्रकरणात सक्‍त ताकीद देण्यात आली.

दरवर्षी हंगामाच्या सुरवातीला गुणनियंत्रण विभागाकडून कृषी केंद्रांची झाडाझडती घेतली जाते. शेतकऱ्यांना अप्रमाणीत तसेच निकृष्ट बियाण्यांचा पुरवठा होणार नाही. याकरीता ही दक्षता घेतली जाते. त्या पार्श्‍वभूमीवर २०२३-२४ या वर्षात एकूण १८८० या उद्दिष्टापैकी १६१९ नमुने घेण्यात आले.

त्यात १११ अप्रमाणीत आढळून आले आहेत. यातील ४३ प्रकरणे न्यायालयीन दाव्यासाठी पात्र ठरली तर ६८ जणांना ताकीद देण्यात आल्याचे गुणनियंत्रण विभागाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. रासायनिक खताचे ६९७ नमुने घेण्यात आले. त्यातील १०९ नमुने अप्रमाणित आढळले.

यामध्ये ८७ न्यायालयीन दावे दाखल करण्यात आले आहेत. २२ जणांना ताकीद देण्यात आली. कीटकनाशकांच्या २०६ नमुन्यांपैकी १७ नमुने अप्रमाणित आढळली तर २० प्रकरणात न्यायालयीन दावे दाखल केल्याचे सांगण्यात आले. कृषी केंद्रधारकांनी अप्रमाणीत किंवा दर्जाहीन निविष्ठांची विक्री न करण्याचे आवाहन या पार्श्‍वभूमीवर करण्यात आले आहे.

यंदाही होणार तपासणी

गुणनियंत्रण अंतर्गंत २०२४-२५ या वर्षातही नमुने घेण्यावर भर देण्यात आला आहे. त्याकरीता उद्दिष्टही ठरवून देण्यात आले आहे. त्यामध्ये बियाणे १८८०, रासायनिक खत ७२८ तर कीटकनाशकांचे २१२ याप्रमाणे लक्षांक आहे. यातील रासायनिक खताचे २५ नमुने आजवर घेण्यात आले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Sowing : जळगाव जिल्ह्यात ५४ टक्के पेरण्या

Agriculture Input Center : बार्शी तालुक्यातील कृषी सेवा केंद्रांवर कारवाई

SRA Recruitment : ‘एसआरए’ची भरती प्रक्रिया लेखी परीक्षा घेऊन पूर्ण करा

Hail Damage Subsidy : गुंठाभर जमीन नसणाऱ्यांना गारपिटीच्या नुकसानीचे अनुदान

Agriculture Crops : पिकांना जगविण्यासाठी धडपड

SCROLL FOR NEXT